पिंपरी येथील नाट्यगृहात भूत बाधा?

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये चाललंय काय असा प्रश्न सध्या नागरिकांना पडलाय. अंधश्रद्धांचं पेव फुटल्यामुळे अनेकांना धक्का बसलाय. आता म्हणे भुताची बाधा झाल्याची तक्रार आलेय.

Surendra Gangan Updated: Mar 14, 2018, 11:38 PM IST
पिंपरी येथील नाट्यगृहात भूत बाधा? title=

पिंपरी : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये चाललंय काय असा प्रश्न सध्या नागरिकांना पडलाय. अंधश्रद्धांचं पेव फुटल्यामुळे अनेकांना धक्का बसलाय. आता म्हणे भुताची बाधा झाल्याची तक्रार आलेय.

पुण्यात दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात एका रूग्णावर जादुटोणा करून बरं करण्याचा प्रयत्न झाल्याच्या बातमीने खळबळ माजल्यावर आता शेजारी पिंपरी चिंचवडमध्ये एका नाट्यगृहात भुताची बाधा झाल्याची तक्रार करण्यात आलीय. पुरोगामी असलेल्या या पुणे आणि परिसरात या अंधश्रद्धांचं पेव फुटल्यामुळे अनेकांना धक्का बसलाय.