मुंबई : रत्नागिरीतील राजापूर येथील नाणार प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आणि शिवसेनेने ग्रामस्थांना पाठिंबा दिला. त्यामुळे विरोधाला अधिक धार मिळाली. या वाढत्या विरोधानंतर सरकारने हा प्रकल्प हलविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नाणार प्रकल्प आता रायगड जिल्ह्यात हलविण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
नाणार प्रकल्पाला होणार विरोध लक्षात घेता आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात लक्ष घातले आहे. प्रकल्पाच्या तीव्र विरोधानंतर सरकारने तो हलिवण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती खास सूत्रांकडून देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी पर्यायी जागेच्या शोधासाठी सहा अधिकाऱ्यांचा चमू तयार केला आहे. हे अधिकारी आता जागेचा शोध घेणार आहेत. त्यानंतर पुढेचे पाऊल उचलेले जाणार आहे.
नाणार प्रकल्प हा आता रायगड जिल्ह्यातील रोहा किंवा माणगाव तालुक्यात हलविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने पर्यायी जागेच्या शोध घेण्यासाठी सहा अधिकाऱ्यांचा चमू निवडण्यात आलाय. हे अधिकारी आता जागेचा शोध घेतील. दरम्यान, शिवसेनेला खूश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही खेळी खेळली असल्याचे बोलले जात आहे. फडणवीस सरकार शिवसेनेपुढे झुकले, अशीही चर्चा सुरु झाली आहे.