Uddhav Thackeray: महाराष्ट्रातल्या राजकारणाचा स्तर खालावला आहे. हे लोकांना आवडलेलं नाही. आम्ही निवडणूकांची वाट पाहतोय, असे जनता सांगत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. अमरावती, नागपूर दौरा करुन आल्यानंतर मातोश्री येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कंलक या शब्दात लागण्यासारख नाही. तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप करता, तेव्हा त्याच्यावर भ्रष्टाचाराचा कलंक लावता. आणि त्यांच्याबरोबरच मांडीला मांडी लावून बसता. मग त्यांच्यावरचे आरोप खोटे होते का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पाऊस हा वेळेवर होत नाही. मग सरकारी योजनेच्या कागदी होड्या सोडायच्या कुठे? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
दरम्यान उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी उच्चारलेल्या कलंकित शब्दावरुन राज्यात घमासान सुरु आहे. यावरही त्यांनी भाष्य केले.माझा कलंकित शब्द इतका परिणामकारक असेल असं वाटलं नव्हतं, असेही ते म्हणाले. तुम्हाला जाणिव करुन दिली तर त्यात चुकीचे काय? असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला.
कलंकित या शब्द प्रयोगामुळे भाजप नेते नितीन गडकरी यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली होती. यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिले. नितीन गडकरींना देखील या अनुभवातून जावं लागल्याचे ते म्हणाले.
अमरावती दौऱ्याप्रमाणे मातोश्रीतील पत्रकार परिषदेतही त्यांनी 'सरकार आपल्या दारी' योजनेवर टिका केली. सरकारं दारी जातंय मात्र घरी जात नाही,असा टोला त्यांनी लगावला. तसेच देशाचे राजकारण आयपीएलसारखं असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी लोकमान्य टिळक पुरस्कारावर देखील यावेळी भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत देण्यात येणार आहे. यावरुन उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. 'ज्यांच्यावर तुम्ही ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला, त्यांच्याच हस्ते पुरस्कार घेणार. मग आधीच्या आरोपाचं काय झालं?' असा सवाल त्यांनी भाजप समोर उपस्थित केला. आता भाजप याला काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.