विदर्भातील उन्हाळा यंदा फारच सौम्य

नागपूरसह विदर्भातील उन्हाळा तीव्र आणि असह्य असतो. (Nagpur temperature) मात्र यंदा विदर्भातील उन्हाळा फारच सौम्य आहे. 

Updated: May 27, 2021, 03:04 PM IST
विदर्भातील उन्हाळा यंदा फारच सौम्य  title=

अमर काणे / नागपूर : नागपूरसह विदर्भातील उन्हाळा तीव्र आणि असह्य असतो. (Nagpur temperature) मात्र यंदा विदर्भातील उन्हाळा फारच सौम्य आहे. दरवर्षी मे महिन्यात पारा 45  त 47 अंश दरम्यान जातो. यंदा मात्र  पारा 43 अंशाच्या पुढे गेलेला नाही. नवतपा सुरु झाला तरी सूर्य नारायणाची तीव्रता अजून दिसून आलेली नाही. विदर्भातील उन्हातील दाहकता चांगलीच असते.

दरवर्षी उन्हाळा मे महिन्यापासून उन्हाचे चटके बसत असतात. पारा 45 अंशाच्या पुढे जातो. उष्णतेच्या लाटेमुळं सर्वजण हैराण होतात. मात्र यंदा मे अखेपर्यंत उन्हाळ्याची ही तीव्रता जाणवलीच नाही. मेच्या अखेरच्या उन्हाळ्यातील सूर्य नारायण विदर्भावर भलताच मेहरबान दिसून आला आहे.

गेल्या 4 दिवसांतील तापमान 

22 मे  2021        40.9 अंश सेल्सिअस
23 मे  2021        39.9 अंश सेल्सिअस
24 मे 2021         41.3 अंश सेल्सिअस
25 मे 2021         39.4 अंश सेल्सिअस
 
 मे महिन्यात दरवर्षी   नागपूरात प्रचंड तापणारे सूर्य नारायण यंदा नागपूरकरांवर चांगलेच मेहरबान आहेत. यंदा मे महिन्यातील नागपुरातील उच्चांकी तापमान 42. 2 अंश सेल्सिअसपर्यंतच पोहोचले आहे. नवतपा सुरु झाला तरी उन्हाची दाहकता मात्र अजूनही गायबच आहे. नवतपामध्ये ऐरवी कुलर,एसी फिक्के पडायचे यंदा मात्र विदर्भातील उन्हाळा तळपलाच नाही.  

दरम्यान यंदाच्या सौम्य उन्हाळा असला तरी त्याचा पावसावर काही परिणाम होणार नसल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केले आहे. सूर्यनारायणाचा प्रकोप  26 मेपर्यंत नागपुरात दिसला नाही. नवतपा सुरुवातीच्या या दोन दिवसात उष्णतेची तीव्रता कमीच होती. अनेक दशकांनंतर नागपुकरांनी हा सौम्य उन्हाळा अनुभवला आहे ज्यामध्ये पारा 43 अंशा पलीकडे मे अखेरपर्यंत गेलेला नाही.

तीव्र उष्णतेचा नवताप

नवतपा 25 मेपासून सुरु झाला आहे. सूर्याने रोहिणी नक्षत्रात प्रवेश केल्यावर नवतपाला प्रारंभ होतो. या नक्षत्रात सूर्य  आणि पृथ्वी यामधील अंतर खूप कमी होते.  त्यामुळे पृथ्वीवर पडणारी सूर्यकिरणे नेहमीपेक्षा अधिक उष्ण असतात. या 9 दिवसांत उष्णतेची तीव्रता प्रखर असते.