अमर काणे, झी मीडिया, नागपूर: नागपूरचे मध्यवर्ती कारागृह (napur central jail) गुन्हेगारांसाठी शिक्षेऐवजी ऐशोआरामची (luxury life) जागा बनली आहे की काय?, असं नागपूर पोलिसांच्या कारवाईत (nagpur police) पुन्हा एकदा समोर आलं आहे. मध्यवर्ती कारागृहातूनच (central jail) गुन्हेगार आपलं गुन्हेगारीचं नेटवर्क (criminals networking) चालवत असल्याचं तपासात पुढे आलं आहे. नागपूर पोलिसांनी काल सेंट्रल जेलमध्ये केलेल्या मोठ्या कारवाईनंतर जेलमधील कारभारावर अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. गोपनीय माहितीच्या आधारावर करण्यात आलेल्या या कारवाईत जेलमधील काही गुन्हेगार जेलमध्ये अमली पदार्थ, बिर्याणी, चिकन - मटण, उबदार कपडे मागवत असल्याची धक्कादायक घटना (nagpur shocking news) समोर आली आहे. शिवाय जेलमधूनच साक्षीदारांना धमक्या ही देत असल्याचं उघड झाले आहे. (Nagpur police has once again revealed whether Nagpur central jail has become a place of comfort for criminals latest marathi news)
धक्कादायक बाब म्हणजे हे सर्व गैरप्रकार जामिनावर सुटलेल्या काही गुन्हेगारांच्या मार्फत राबविले जात असून यामध्ये जेलमधील काही भ्रष्ट कर्मचारी सुद्धा सहभागी असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी जेलमध्ये कैदेत असलेले दोन सराईत गुन्हेगार, जामिनावर सुटलेले तीन गुंड यांच्यासह जेलमधील दोन कर्मचाऱ्यावर (crime news) गुन्हा दाखल केला आहे. सर्वात लाजिरवाणी बाब म्हणजे या सर्व प्रकारासाठी एक खास रेट कार्ड (red card) अमलात होते.
अमली पदार्थ, मोबाईल - 10 हजार
बिर्याणी, चिकन, मटण, चमचमीत खाद्यपदार्थ - 3 ते 5 हजार
उबदार कपडे, ब्लेंकेट - 1 ते 2 हजार
जेलमधील काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांनी या कामासाठी खातेवाटपच केले होते.
हेही वाचा - गावची शान! तीन शेतकरीपुत्र एकाच वेळी अग्निवीर; ढोलताशा, डीजे लावून गावभर मिरवणूक
1. खाद्य पदार्थ इन्चार्ज
2. अमली पदार्थ इन्चार्ज
3. कपडे इन्चार्ज
असे कार्य वाटप काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांनी केल्याचे पोलीस तपास उघड झाले आहे. याप्रकरणी जेलमधील आणखीन काही भ्रष्ट कर्मचारी आणि अधिकारी पोलिसांच्या रडारवर आहे. जेलमधील या रॅकेट उघडकीस आल्यनंतर ही घटना नागपुरातील गुन्हेगारीचा नागपूर सेमध्यवर्ती कारागृह एक प्रमुख केंद्र बनल्याचे समोर आले आहे.