'कर न भरणाऱ्यांच्या घरासमोर नगाडे'

गेल्या अनेक वर्षांपासून पाणीपट्टी आणि मालमत्ता कर न भरणाऱ्यांच्या विरोधात नागपूर महानगर पालिकेने आता मोहीम उघडली आहे. या अंतर्गत कर बुडव्यांच्या व्यापारिक प्रतिष्ठाना समोर पालिका पदाधिकरी नगाडे वाजवत आहेत. 

Updated: Jul 18, 2017, 10:42 PM IST
'कर न भरणाऱ्यांच्या घरासमोर नगाडे' title=

नागपूर : गेल्या अनेक वर्षांपासून पाणीपट्टी आणि मालमत्ता कर न भरणाऱ्यांच्या विरोधात नागपूर महानगर पालिकेने आता मोहीम उघडली आहे. या अंतर्गत कर बुडव्यांच्या व्यापारिक प्रतिष्ठाना समोर पालिका पदाधिकरी नगाडे वाजवत आहेत. 

शहरात एकूण थकीत मालमत्ता आणि जल कराची रक्कम सुमारे ४७५ कोटी असून याच वसुलीकरता आजपासून या अभियानाला सुरवात झाली आहे. पण पाणी पुरवठा बंद करणे किंवा मालमत्ता जप्त करण्यासारखे पर्याय असताना नगर पालिकेने नगारे वाजवण्याचा पर्याय का निवडला हा प्रश्न विचारला जातो आहे. 

नागपूरच्या या प्रतिष्ठित एम्प्रेस सिटी मॉल समोर हे नगाडा आंदोलन महानगर पालिके तर्फे केले जाते आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मॉलने थकीत देयके दिले नसल्याचा आरोप पालिकेने केला आहे. या प्रलंबित देयकांमुळे शहराच्या विकास कामांवर विपरीत परिणाम होत असल्याची खंत पालिका पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

दरम्यान, कर भरायची आपली तयारी असली तरीही नेमका कर किती या बद्दल वाद असल्याचा दावा एम्प्रेस सिटी मॉलशी संबंधित अधिकाऱ्यांनी केला आहे. देयके संबंधी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात खटला प्रलंबित असून सुमारे ५० कोटींचे संचित देयके असल्याचा दावा महानगर पालिकेने केला असला तरीही प्रत्यक्षात मात्र ही रक्कम ४ कोटी असल्याचा दावा मॉलचे कायदेशरी सल्लागार निशांत गोडे यांनी केला आहे.