पुणे : मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेचा प्रवास हा या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. याला मुख्यत्वे कारण आहे, पावसामुळे या मार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे आणि त्याकडे दुर्लक्ष करणारी यंत्रणा.
लोणावळा शहरात मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर कुसगाव टोलनाक्याच्या पुढे असणाऱ्या वलवण पुलावर या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे.
या खड्ड्यांमुळे वेगात वाहन घेऊन येणारे वाहन चालक याठिकाणी गडबडत आहे. आणि त्यामुळे येथे अपघात होण्याच्या शक्यतेत वाढ झाली आहे. मागील अनेक दिवसांपासून हे खड्डे आता दिसत आहे त्याच स्थितीत असून सदर खड्डे बुजविण्याच्या दृष्टीने कोणतेही प्रयत्न केले जात नाहीये. सदरचे खड्डे वेळीच बुजविले न गेल्यास या ठिकाणी मोठा अपघात होवू शकतो.