मुंबई - गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'हा' घाट वाहतुकीसाठी पुन्हा बंद

Mumbai Goa Highway work : मुंबई - गोवा महामार्गाने प्रवास करणारे (Mumbai Goa Traval) आणि रस्ता वाहतूक करणाऱ्यांसाठी आताची मोठी बातमी आहे. 

Updated: Nov 9, 2022, 10:44 AM IST
मुंबई - गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'हा' घाट वाहतुकीसाठी पुन्हा बंद title=

Mumbai Goa Highway Road work : मुंबई - गोवा महामार्गाने प्रवास करणारे (Mumbai Goa Traval) आणि रस्ता वाहतूक करणाऱ्यांसाठी आताची मोठी बातमी आहे. मुंबई - गोवा महामार्गावरील (Mumbai Goa Highway) परशुराम घाट (Parashuram Ghat Road work) वाहतुकीसाठी पुन्हा बंद केला जाणार आहे. पावसाळ्यात हा घाट दरड कोसळल्यामुळे बंद होता. आता पुन्हा या घाटात रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या घटातून वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे परशुराम घाट आता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. (Mumbai Goa highway on the widening of roads in parashuram ghat will continue )

 गेल्यावर्षभारापासून मुंबई -गोवा महामार्गाच्या चौपदरी करणाचं काम सुरु आहे..पावसाळ्यात दरडी कोसळल्यामुळे महिनाभर घाटातील वाहतूक बंद करण्यात आली होती. रस्त्यावरील दरड हडविल्यानंतर घाटातून एकेरी वाहतूक सुरु होती. त्यानंतर पंधरा दिवसांनी वाहतूक सुरळीत झाली होती. आता पाऊस थांबल्याने चौपदरीकरण आणि भरावाचे काम वेगानं व्हावं, यासाठी या घाटातील वाहतूक पुन्हा बंद ठेवण्याचं नियोजन आहे.

पावसाळ्यात परशुराम घाटात दरड कोसळली होती.

पावसाळ्यात परशुराम घाटात दरड कोसळली होती.

 मुंबई - गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी. चिपळूण जवळच्या परशुराम घाटात पावसाळ्यात दरड कोसळली होती. त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली होती. जवळपास महिनाभर पावसाळ्यात वाहतूक बंद होती. त्यामुळे या मार्गावरुन कोकणात तसेच गोव्यात जाता येत नव्हते. त्यामुळे पुणे, सातारा, कोल्हापूर मार्गे फोंडा घाट असा सिंधुदुर्ग आणि गोव्याचा प्रवास करावा लागत होता. तसेच रत्नागिरीत जाण्यासाठी कोल्हापूर मार्गे आंबा घाट मार्गे प्रवास कराला लागत होता. पावसाळ्यात आंबा घाटात दरड कोसळल्याने हा घाटही वाहतुकीसाठी बंद होता. त्यामुळे कोल्हापूर - रत्नागिरी वाहतूक ठप्प होती. त्यामुळे पावसाळ्यात कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी कसरत करावी लागत होती.