नारायण राणेंच्या फार्म हाऊसजवळ बंद कारमध्ये सापडला मृतदेह

Mumbai - Goa Highway news: मुंबई गोवा हायवे वर नारायण राणे यांच्या फार्म हाऊसच्या बाजूला एका ऑडी गाडीत मृतदेह मिळाला असून एकच खळबळ माजली आहे.

Updated: Nov 19, 2022, 03:11 PM IST
नारायण राणेंच्या फार्म हाऊसजवळ बंद कारमध्ये सापडला मृतदेह title=

Mumbai - Goa Highway news: सध्या आपल्या समाजात अनेक विचित्र आणि धक्कादायक घटना घडताना दिसत (Shocking News)आहेत. त्यामुळे लोकांमध्ये कायमच भितीचं वातावरण असल्याचे पाहायला मिळते आहे. सध्या श्रद्धा वालकर हत्याकांडांमुळे (Shraddha Walker Case) अख्ख्या देशात खळबळ माजली आहे. 2012 साली निर्भया प्रकरण झाल्यानंतर आता या नव्या हिसंक प्रकरणानं देशात पुन्हा एकदा राग, चिंता आणि भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशा या घटनांमुळे लहान मुलींपासून ते मोठ्या तरूण मुलींच्या (Young Girls) सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाल आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा श्रद्धा ही पुन्हा एकदा बळी गेली आहे. सध्या असंच एक प्रकरण ताजं असताना मुंबई - गोवा महामार्गावर (Mumbai - Goa Highway) एक मृतदेह आढळला आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. (mumbai goa highway dead body found in a closed car)

मुंबई गोवा हायवेवर नारायण राणे (Narayan Rane) यांच्या फार्म हाऊसच्या बाजूला एका ऑडी (Audi) गाडीत मृतदेह मिळाला असून या प्रकरणानं एकच खळबळ माजली आहे. पनवेल (Panvel) पोलीस घटनास्थळी पोहचले असून गाडीची कसून तपासणी सुरू आहे. मृत व्यक्ती गाडीच्या मागच्या बाजूला मृत अवस्थेत आढळला असून मृताच्या नाका तोंडातून रक्त वाहत असल्याचे दिसले होते. आता हा नक्की काय प्रकार आहे?, याचा तपास सुरू असून अगदी महागड्या गाडीत डेड बॉडी (Dead Body) सापडल्याने खळबळ माजली आहे.

या मृत व्यक्तीचं नावं संजय कार्ला असल्याचं समजते आहे. अद्याप त्याचा व्यवसाय कळला नसून हा मृतदेह येथे कसा आला आणि ही गाडी येथे कोणी आणली याचा तपास सध्या पोलिस करत आहेत. मृतदेह सापडल्यानं सगळीकडेच चिंतेचं आणि भितीचं वातावरण आहे. त्यामुळे सध्या सगळीकडेच सतर्क (Alertness) राहण्याचा इशारा यामुळे पुन्हा एकदा उपस्थित राहिला आहे.