रेल्वेत मुलाला नोकरी लावून देण्याचे पोलिसालाच दिले आमिष, पुढे घडले असे काही..

Mumbai Crime News: मी तुमच्या मुलाला रेल्वेत ज्युनिअर इंजिनीअर पदावर नोकरी देईन' असे आश्वासन त्याने हवालदार मोहिते यांना दिले. या बहाण्याने आरोपीने मोहिते यांच्याकडून 5 लाख रुपये देखील घेतले. 3 लाख चेक आणि 2 लाख कॅश असा त्यांच्यात पैशांचा व्यवहार झाला.

Pravin Dabholkar | Updated: Aug 28, 2023, 06:27 PM IST
रेल्वेत मुलाला नोकरी लावून देण्याचे पोलिसालाच दिले आमिष, पुढे घडले असे काही.. title=

Mumbai Crime News:  माझी मंत्रालय आणि रेल्वेमध्ये ओळख आहे. तेथे तुम्हाला नोकरी लावून देईन,असे सांगून तो सर्वांकडून पैसे उकळायचा. असे एक एक करुन त्याने अनेकांना लाखोंचा गंडा घातला. त्याचा हे काळे कारनामे तब्बल 4 वर्षे सुरु होते. तब्बल चार वर्षांनी तो पोलिसांच्या ताब्यात आला आहे. 

प्रसाद कांबळे असे आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याने हवालदार तानाजी मोहिते यांची फसवणूक केली आहे. ते डीबी पोलीस ठाण्यात तैनात कार्यरत आहेत. आरोपी प्रसाद कांबळे हा त्यांच्या घराजवळच राहत होता. नोव्हेंबर 2017 मध्ये आरोपी कांबळेने तानाजी यांना दक्षिण मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये बोलावले होते. माझ्या मुलाने इंजिनीअरिंग केली असून तो चांगल्या नोकरीच्या शोधात असल्याचे मोहिते यांनी प्रसादला सांगितले. तेव्हा 'माझी मंत्रालय, रेल्वे अशा सर्व ठिकाणी चांगली ओळख आहे.

मी तुमच्या मुलाला रेल्वेत ज्युनिअर इंजिनीअर पदावर नोकरी देईन' असे आश्वासन त्याने हवालदार मोहिते यांना दिले. या बहाण्याने आरोपीने मोहिते यांच्याकडून 5 लाख रुपये देखील घेतले. 3 लाख चेक आणि 2 लाख कॅश असा त्यांच्यात पैशांचा व्यवहार झाला. पैसे घेतल्यानंतर प्रसादची नियत फिरली. त्याने मोहिते यांचे फोन उचलणे बंद केले. त्यांना भेटणेही तो टाळू लागला. त्यांचा नंबरदेखील त्याने ब्लॉकलिस्टमध्ये टाकला. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे हवालदार मोहिते यांच्या लक्षात आले. 

तरुणांना अश्लील व्हिडीओ कॉल करुन फसवणारी तरुणी सापडली, 'अशी' आली पोलिसांच्या जाळ्यात

त्यांनी यासंदर्भात ग्रामदेवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी केंद्र सरकारच्या इंटरऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टीमच्या मदतीने आर्थर रोड तुरुंगात आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपी प्रसाद कांबळे हा 38 वर्षांचा असून त्याने मोहिते यांच्यासह त्याने अनेकांना असा लाखोंचा गंडा घातला आहे. 

प्रसाद कांबळे याने याआधी नागपाडा येथील एका डॉक्टरची 65 लाख रुपयांची फसवणूक केली होती,अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.  2017 झाली नागपाडा येथील डॉक्टरच्या मुलीला केईएममध्ये नोकरीचे आमिष दाखवत त्याने 65 लाख रुपये लुटले होते. 

SBI च्या मुंबई शाखेत नोकरी आणि 85 लाखांपर्यंत पगार, 'येथे' पाठवा अर्ज

पोलिसांनी ICJS पोर्टलवर तपास केला असता आरोपी प्रसाद कांबळे हा आर्थर रोड तुरूगांत असल्याचे त्यांना आढळले. त्यानंतर ऑगस्टच्या सुरुवातीलाच त्याला अटक करण्यात आले.