मुंबई : दक्षिण मध्य मुंबईचे कॉंग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांचा पराभव झाला असून या ठिकाणी शिवसेनेचे अरविंद सावंत विजयी झाले आहेत. यानंतर मिलिंद देवरा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईच्या नवनिर्वाचित आणि निवडून आलेल्या खासदारांना त्यांनी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींसाठी लोकसभेमध्ये परिणामकारक कामगिरी सर्व खासदार करतील अशी मी आशा करतो. राजकीय विरोधक असूनही आमच्या शहरासाठी कायम माझा सहयोग आणि पाठिंबा राहील असे देवरा यांनी म्हटले आहे.
मुंबई काँग्रेसने अतिशय नम्रतेने मुंबईच्या लोकांचा निर्णय स्वीकारला आहे. काँग्रेस पक्षाने पाच मतदारसंघातून अनुभवी आणि प्रसिद्ध उमेदवार उभे केले, ज्यांनी भाजपा आणि शिवसेनेला कडवी झुंज दिल्याचे देवरा म्हणाले. सर्व मतदात्यांना, कामगारांना आणि काँग्रेस पक्षाच्या शुभेच्छुकांचे त्यांनी आभार मानले. काँग्रेस पक्षाची एकता, कामगारांची बांधिलकी आणि मुंबईकरांचा विश्वास यामुळेच रोज ही लढाई अशीच चालू ठेवण्याचं बळ मिळत आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये आम्ही नक्कीच भाजपा आणि शिवसेनेला विरोधक म्हणून चांगलीच टक्कर देऊ असेही ते म्हणाले.
सर्व मुंबईकरांकरिता एक योग्य न्याय मिळवून देत सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या कल्याणावर लक्ष केंद्रीत करून नव्या सरकारचा विकासाप्रती योग्य अजेंडा असेल अशी मुंबई काँग्रेस अपेक्षा करत आहे.