पुणे : सरकारला वेठीस धरण्यासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दिली आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान वेळापत्रकानुसारच परीक्षा घ्यावी अशी मागणी करत संभाजी ब्रिगेड परीक्षा केंद्रांना संरक्षण देईल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीवर निर्णयाची शक्यता, मराठा समाजातल्या नेत्यांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांची चर्चा सुरू तर विद्यार्थ्यांना वेठीस धरणं योग्य नाही, संभाजी ब्रिगेटचे प्रवीण गायकवाड यांची प्रतिक्रिया@ashish_jadhaohttps://t.co/kpo9phDaSR pic.twitter.com/ezfoxYHzSI
— ZEE २४ तास (@zee24taasnews) October 9, 2020
जोपर्य़ंत मराठा आरक्षण मिळत नाही आणि यावर तोडगा निघत नाही. तोपर्यंत पोलीस भरती रद्द करावी आणि एमपीएससी परीक्षा घेऊ नये, अशी मराठा समाजाकडून मागणी होत आहे. दरम्यान, एमपीएससी विद्यार्थ्यांनी परीक्षा घेण्यात यावी, असे आवाहन केले आहे. आम्ही अभ्यास केला आहे. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. मात्र, आमचे वर्ष वाया जाईल, असे सांगत परीक्षा झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आजपासून मराठा आरक्षणासाठी ठोक मोर्चाची सुरुवात तुळजापुरात आई तुळजाभवानीच्या दर्शनाने झाली...या मोर्चाला खासदार संभाजीराजे भोसले उपस्थित आहेत. सकाळपासूनच उस्मानाबाद जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून मराठा बांधव तुळजापुरात जमायला सुरवात झाली. यापार्श्वभूमीवर तुळजापुरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उस्मानाबादमध्ये मराठा समाज आक्रमक झालेला दिसून येतोय, ठोक मोर्चाला सुरवात झाली.
दरम्यान, मराठा आरक्षणावरुन मराठा ठोक मोर्चा आक्रमक झाला आहे. वेळ मराठा आरक्षणासाठी तलावारीही काढू असा इशारा आता खासदार संभाजीराजे यांनी दिला आहे. संयम कधी सोडायचा हे आम्हाला माहित आहे. गरज पडेल तेव्हा तलवारी काढू असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. आम्ही भीक नाही तर आमचा हक्क मागत आहोत. आम्हाला गृहित धरु नका आणि कायदा हातात घेण्याची वेळ आमच्यावर आणू नका असंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. येत्या १५ तारखेला अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.