LokSabha Election: राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी 20 वर्षात पहिल्यांदाच आपण लोकसभा निवडणूक (LokSabha Election) लढणार नाही असं म्हटलं आहे. पण आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचारासाठी वाट पाहत आहोत असंही सांगितलं आहे. 44 वर्षांत प्रथमच, माझे वडील किंवा मी दक्षिण मुंबईत मतपेटीवर असणार नाही असंही त्यांनी सांगितलं आहे. मिलिंद देवरा यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली असून, यामध्ये वडिलांसोबतचा फोटोही शेअर केला आहे.
मिलिंद देवरा यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "20 वर्षांत पहिल्यांदाच मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही. आणि, 44 वर्षांत प्रथमच, माझे वडील किंवा मी दक्षिण मुंबईत मतपेटीवर असणार नाही. उमेदवार म्हणून सलग चार निवडणुकांनंतर, मी "मुंबई, महाराष्ट्र आणि त्यापलीकडे राज्यसभा खासदार" म्हणून पंतप्रधान मोदी आणि शिंदे यांच्या प्रचारासाठी उत्सुक आहे".
यावेळी त्यांनी दक्षिण मुंबईतील नागरिकांना आपण स्थानिक आणि देशतापळीवर जमेल तितकं प्रतिनिधित्व करु असं आश्वासनही दिलं. "मला दक्षिण मुंबईतील रहिवाशांना खात्री द्यायची आहे की एक राज्यसभा खासदार म्हणून मी स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवर माझ्या क्षमतेनुसार त्यांचे प्रतिनिधित्व करत राहीन. तुमचा पाठिंबा म्हणजे माझ्यासाठी सर्वस्व आहे," असं ते म्हणाले आहेत.
For the first time in 20 years, I won't be contesting in a Lok Sabha election. And, for the first time in 44 years, my father or I will not be on the ballot box in South Mumbai.
After four consecutive elections as a candidate, I am looking forward to… pic.twitter.com/FRLKYVo1A7
— Milind Deora | मिलिंद देवरा (@milinddeora) May 1, 2024
मिलिंद देवरा यांनी 2004 आणि 2009 मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात दक्षिण मुंबईत मतदान होणार आहे. शिवसेनेने (शिंदे गट) या मतदारसंघातून आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. माजी नगरसेवक आणि मुंबई महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव यांच्यासमोर ठाकरे गटाते दक्षिण मुंबईचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांचं आव्हान असणार आहे.
दरम्यान, भाजपमध्येही या जागेसाठी चुरस होती. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र, शिंदे ही जागा लढविण्यावर ठाम होते. मिलिंद देवरा यांनाही पक्षाचे उमेदवार मानले जात होते. पण अखेर मराठी चेहरा असल्याने यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे अरविंद सावंत 4,21,937 मतांनी विजयी झाले आणि त्यावेळी काँग्रेसमध्ये असमारे मिलिंद देवरा 3,21,870 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर होते.