मान्सूनचा परतीचा प्रवास १० ऑक्टोबरपासून

मान्सूनचा परतीचा प्रवास १० ऑक्टोबरपासून सुरू 

Updated: Oct 1, 2019, 08:49 AM IST
मान्सूनचा परतीचा प्रवास १० ऑक्टोबरपासून  title=

मुंबई : मान्सूनचा परतीचा प्रवास १० ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. देशभरात यावर्षी सरासरीच्या ११० टक्के पाऊस झाला आहे. जून महिन्यात सरासरीहून ३३ टक्के कमी पाऊस झाला मात्र जुलै ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यात पावसाने उणीव भरून काढली. १९८८ नंतरचा म्हणजे गेल्या २५ वर्षातील सर्वाधिक पाऊस महाराष्ट्रात लागला आहे. सरासरीपेक्षा ३२ अधिक पाऊस लागला आहे. १९८८ ला सरासरीपेक्षा ३७.६ टक्क् अधिक पाऊस लागला होता. 1996 नंतर प्रथमच देशात सरासरीच्या 110 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस नोंदवण्यात आला आहे. 

2001 नंतर म्हणजे जवळपास 19 वर्षानंतर प्रथमच जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर तिन्ही महिने सलग सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. 

1982 नंतर प्रथमच देशातील ऑगस्ट सप्टेंबरचे सरासरी पर्जन्यमान 130 टक्के नोंदवण्यात आलंय.1996 नंतर प्रथमच ऑगस्ट सरासरीच्या महिन्यात 115 % मान्सूनची नोंद झाली आहे. 

पुणेकरांचे हाल 

पावसाने हाहाकार उडवून दिला. तीन तासांत ११२ मिलीमीटर एवढा धो धो पाऊस कोसळला. मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुराने पुणे जिल्ह्यात १३ जणांचे बळी घेतले आहेत. अनेक जनावरंही मृत्यूमुखी पडली आहेत. घरांची पडझड झाली असून चारचाकी आणि दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. महापुराने पुणेकरांची दैना उडवून दिली. अवघ्या तीन तासांमध्ये पडलेल्या पावसानं पुण्यातल्या वाहनांचे अतोनात नुकसान झाले.

अतिवृष्टीचे ४० बळी

बिहारमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात आत्तापर्यंत ४० जणांचा बळी गेलाय. तब्बल ७५८ गावांना पुराचा फटका बसलाय. १७ ठिकाणी पुनर्वसन केंद्र निर्माण करण्यात आली आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफकडून मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरू आहे. पाटण्यात आत्तापर्यंत ३४२ मिमी पाऊस झालाय. पाटणा आणि परिसरात मदतकार्य पोहोचवण्यात लष्कराचीही मदत घेतली जात आहे.