...आणि माकडाने घेतला स्विमिंग टॅंकमध्ये पोहण्याचा असा आनंद !

माकडाच्या मर्कटलिला आपण बऱ्याचदा ऐकतो किंवा पाहतो. पण माकडाच्या मनुष्यलिला क्वचितच पाहायला मिळतात. पुण्यात त्याचा अनुभव आला.  

Updated: May 9, 2018, 01:56 PM IST
...आणि माकडाने घेतला स्विमिंग टॅंकमध्ये पोहण्याचा असा आनंद ! title=

पुणे : माकडाच्या मर्कटलिला आपण बऱ्याचदा ऐकतो किंवा पाहतो. पण माकडाच्या मनुष्यलिला क्वचितच पाहायला मिळतात. पुण्यात त्याचा अनुभव आला. इथल्या एका माकड महाशयानं चक्क स्विमिंग टॅंकमध्ये पोहोण्याचा आनंद घेतला. सोमवार पेठेतील शाहू तलावामधील ही घटना आहे. भर दुपारी उन्हामुळे अंगाची लाही होत असताना जरासा गारवा घ्यावासा वाटणं यात गैर ते काय. त्यामुळेच या माकडमहाशयांनी तलावात सूर मारत मनसोक्त पोहोण्याचा आनंद घेतला. 

खेळ पाहण्याचा आनंद

तलावात लहान मुलांना तरंगण्यासाठी असलेल्या रबर पॅडवर बसून त्यानं जरावेळ मस्तीही केली. गंमत म्हणजे यावेळी तलावात इतर मुलेही पोहत होती. त्यांनी या माकडासोबत पोहोण्याचा तसेच त्याचा हा खेळ पाहण्याचा आनंद लुटला. सुमारे अर्धा तास पोहून झाल्यावर या माकड महाशयांनी काठावर बसकन मांडली. छानपैकी अंग झटकलं आणि त्यानंतर ते पुन्हा उड्या मारत झाडाकडे प्रस्थान केलं. शाहू टॅंक परिसरात माकडांची एक टोळी असून त्यातील एक माकड पोहोण्यासाठी तलावात उतरते. यापूर्वीदेखील हे माकड दोन- तीन वेळा पोहून गेल्याचं इथले लोक सांगतात.