भेसळ ओळखणारी फिरती मोबाईल लॅब दाखल

कोल्हापूरकरांनो आता अन्नभेसळीपासून अगदी निश्चिंत राहा. कारण भेसळ ओळखणारी एक मोबाईल लॅब तुमच्या सेवेत दाखल झाली आहे. 

Updated: Dec 17, 2019, 03:29 PM IST

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : कोल्हापूरकरांनो आता अन्नभेसळीपासून अगदी निश्चिंत राहा. कारण भेसळ ओळखणारी एक मोबाईल लॅब तुमच्या सेवेत दाखल झाली आहे. अन्नात भेसळ करणाऱ्यांनो सावधान. आता तुमची खैर नाही. कारण भेसळयुक्त पदार्थ ओळखणारी मोबाईल फूड टेस्टिंग लॅब केंद्र सरकारने सुरू केली आहे. महाराष्ट्रातील दुसरी आणि कोल्हापुरातील पहिलीच लॅब नुकतीच कोल्हापुरात दाखल झाली आहे.

या मोबाईल लॅबमुळे दूध, दुग्धजन्य पदार्थ तसेच दैनंदिन जीवनातील रोजच्या वापरातील पदार्थांचाही तपासणी होणार आहे. शिवाय भेसळ ओळखण्याचे प्रशिक्षण देखील ग्राहकांना या फिरत्या लॅबच्या माध्यमातून दिल जाणार आहे.

पुणे विभागासाठी असलेले ही अत्याधुनिक लॅब कोल्हापूर; सांगली जिल्ह्याबरोबर सातारा जिल्ह्यासाठी असणार आहे. हीच मोबाईल लॅब जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांमध्ये आणि तालुक्यांमधील गावा गावामध्ये जाऊन लोकांना सेवा देणार आहे. त्यामुळे भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही.