जयेश जगड / अकोला : आज अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी वेषांतर करून विविध शासकीय विभागात स्टिंग ऑपरेशन करून खळबळ माजवून दिली. सकाळपासून ते विविध ठिकाणी धाड टाकत होते पण नेमके कुठल्या वेशात ते फिरत आहे याची कुणाला कल्पना नव्हती. त्यामुळे पालकमंत्री कुठे आहेत. त्यांनी कोणाची झाडाझडती घेतली याची माहिती कुणालाही उपलब्ध होऊ शकली नाही.
बच्चू कडू सर्वप्रथम अकोला महापालिकेत आज प्रहार संघटनेच्यावतीने घरकुलांसाठी आंदोलनात सहभागी झाले. या आंदोलनात सामान्य नागरिक म्हणून पालकमंत्री बच्चू कडू हे स्वतः उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी मुस्लिम व्यक्तीचे वेषांतर करत तोंडाला मास्क, फडके गुंडाळून आयुक्तांच्या स्विय सहायकाला आयुक्तांच्या भेटीसाठी विनंती केली. पण, आयुक्तांच्या स्विय सहायकाने नेहमी प्रमाणे त्यांना आयुक्त आता नाही दूपारी चार ते पाच भेटा असे पठडीतील सरकारी उत्तर दिले.
यानंतर बच्चू कडू यांनी आपला मोर्चा गुटखा व्यापऱ्यांकडे वळविला पातूर शहरातील दोन पानसेंटर येथे पालकमंत्री बच्चू कडू यांनी मोठ्या प्रमाणात गुटखा मागितला..दोन्ही पान सेंटर चालकांनी तुम्हाला जितका पाहिजे तितका देऊ असे ठोस आश्वासन पालकमंत्र्यांना दिले. आणि पालकमंत्र्यांनी 9 हजाराचा गुटखा देखील खरेदी केला.
आज जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी केलेल्या वेषांतराने शासकीय यंत्रणा चांगलीच धास्तावली होती.. शासकीय यंत्रणा काम करत नसल्याने आज पालकमंत्र्यांना वेषांतर करत त्याचा आढावा घेतला आहेय. या वेषांतराची आज संपुर्ण जिल्ह्यात चर्चा होती.
ती पातुर येथील गुटख्यानंतर उघडकीस आली..या कारवाई दरम्यान तीन गुटखा विक्रेतांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहेय..आज दिवसभराच्या अनेक कारवाई दरम्यान बच्चू कडू यांना काही चांगले तर काही अत्यंत वाईट अनुभव आले.
पोलिसांच्या कार्यावर आणि त्यांच्या वागणुकीवर बच्चू कडू यांनी सर्वाधिक नाराजी व्यक्त केली.तर राज्यात गुटखा बंदी आहे की नाही असा प्रश्न उपस्थित करत अन्न व औषध प्रशासना वर नाराजी व्यक्त केली.