लातूर : शिवसेनेने भाजपसोबत ट्रिपल तलाक घ्यावा - ओवेसी

उदगीर शहरातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर आयोजित असदोद्दीन ओवेसी यांच्या सभेला म्हणावा तसा प्रतिसाद यावेळी मात्र मिळाला नाही.

Updated: Apr 22, 2018, 08:23 PM IST
लातूर : शिवसेनेने भाजपसोबत ट्रिपल तलाक घ्यावा - ओवेसी title=

शशिकांत पाटील, झी मीडीया, लातूर : शिवसेनेने भाजपसोबत ट्रिपल तलाक घ्यावा असं आव्हान एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी दिलंय. लातूर जिल्ह्यातील उदगीर इथल्या जाहीर सभेत ते बोलत होते. तसंच केंद्र सरकारने ट्रिपल तलाक आणि शरीयतमध्ये ढवळाढवळ करु नये असा इशाराही त्यांनी मोदी सरकारला दिला आहे. 

शरियत कायद्यात ढवळाढवळ करू नये

या वेळी बोलताना लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील जाहीर सभेत एमआयएमचे प्रमुख, खा. असदोद्दीन ओवेसी यांनी ट्रिपल तलाक आणि शरीयतमध्ये हस्तक्षेप न करण्याचा सल्ला केंद्रातील मोदी सरकारला दिला. राज्यातील शिवसेना-भाजप सरकारने कायम एकमेकांच्या विरोधात भांडत असतात. त्यामुळे हिंमत असेल तर शिवसेनेने भाजपसोबत ट्रिपल तलाक घेण्याची हिंमत दाखविण्याचे आवाहन यावेळी ओवेसी यांनी केले. केंद्रातील मोदी सरकारने मुस्लिमांच्या शरियत कायद्यात ढवळाढवळ करू नये. तो आमचा हक्क आहे. त्याच्यात कोणी ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केल्यास गंभीर परिणाम होतील असा इशाराच यावेळी असदोद्दीन ओवेसी यांनी दिला.

ओवेसी यांच्या सभेला म्हणावा तसा प्रतिसाद नाही

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या वतीने भरविण्यात आलेल्या या सभेत देशाच्या विविध भागातून आलेल्या मुस्लिम नेत्यांनी शरियत मधील केंद्राचा हस्तक्षेप मान्य नसल्याचे म्हटलें आहे. दरम्यान नुकताच लागलेल्या मक्का मस्जिद केस मधील सर्वच आरोप निर्दोष कसे सुटले असा सवाल उपस्थित करीत मग तिथे बॉम्बस्फोट कोणी केला असा सवालही ओवेसी यांनी उपस्थित केलाय ? याशिवाय  अजमेर दर्गा ब्लास्ट, नांदेड, परभणी-जालना याठिकाणी कोणी बॉम्बस्फोट केले असाही सवाल यावेळी ओवेसी यांनी पुन्हा एकदा उपस्थित केला. उदगीर शहरातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर आयोजित असदोद्दीन ओवेसी यांच्या सभेला म्हणावा तसा प्रतिसाद यावेळी मात्र मिळाला नाही.