नाशिक : राज्यात एकिकडे एसटी कामगारांचा संप सुरु असतानाच दुसरीकडे या संपाची सांगता होत नाही, तोच आणखी एका कामगार संघटनेनं अचानकच संप पुकारल्यामुळं आता काही अडचणी उभ्या राहताना दिसू लागल्या आहेत.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगारांनी अचानक काम बंद आंदोलन पुकारलं आहे. यामुळे कामगारांअभावी कांदा व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी करण्यास तसेच लिलावात आलेला घेण्यास नकार दिल्याने कांदा लिलाव सुरू करावे अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
पिंपळगाव बाजार समितीमध्ये धुळे, साक्री, नंदुरबार, मालेगाव आणि निफाड या ठिकाणाहून शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस आणला आहे.
तिथं आलेल्या एका शेतकऱ्यानं सद्य परिस्थितीबाबत माहिती दिली. 'अवकाळी पावसामुळे कांदा खराब झाला होता उरलासुरला कांदा मार्केट घेऊन आलो आहे मात्र या ठिकाणी बाजार समिती कांदा लिलाव बंद असल्याने आता कांदा विक्री कसा करावा असा प्रश्न उभा राहिला आहे', असं त्या शेतकऱ्याचं म्हणणं.
शेतकरी कांदा लिलावाला आणण्यासाठी ट्रॅक्टर भाडे ततत्वावर आणतात. अशातच लिलाव झाला नाही, तर त्यांच्यावर रिकाम्या आल्यापावली माघारी जाण्याची वेळ येते.
इतकंच नव्हे तर, येण्या-जाण्याचं पूर्ण ट्रॅक्टर भाडं देण्याची वेळ येत असल्यामुळं त्यांनाच आर्थिक फटका बसतो. ज्यामुळं लिलाव सुरु करावा अशी मागणी त्यांनी केली.
अखेर शेतकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन पिंपळगाव येथील कांदा व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याची हाल होऊ नये कांदा लिलाव सुरु केला.
कांदा व्यापाऱ्यांच्या खळ्यावर काम करणाऱ्या टोळी नंबर 2 च्या माथाडी कामगारांचा विविध मागण्यांसाठी संप सुरू असताना पिंपळगाव बाजार समिती धुळे, नंदुरबार, मालेगाव, चांदवड आणि निफाड तालुक्यातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पूर्वसूचना न मिळाल्यामुळे शंभरहून अधिक वाहनांमध्ये कांदा विक्रीला आणल होता.
शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे आलेल्या कांद्याचे लिलाव करण्याची मागणी केली असता यानंतर बाजार समिती प्रशासनाने व्यापाऱ्यांना विनंती केली व्यापाऱ्यांनी या विनंतीला तत्काळ मान्यता देत कांद्याचे लिलाव केले कांद्याला कमाल 3480 , किमान 1000 तर सर्वसाधारण 2200 रुपये प्रती क्विंटल कांदा बाजार भाव मिळाले.