Marathi Bhasha Din 2022 : जगभरात मराठी भाषा दिन म्हणून साजरा

'मराठी भाषा दिन' हा दिवस महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये अत्यंत उत्सहात साजरा केला जातो

Updated: Feb 27, 2022, 08:08 AM IST
Marathi Bhasha Din 2022 : जगभरात मराठी भाषा दिन म्हणून साजरा  title=

मुंबई : प्रसिद्ध कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. आजचा दिवस म्हणजे २७ फेब्रुवारी 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो. जगभरात २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये अत्यंत उत्सहात साजरा केला जातो.

मराठी टिकवायची असेल तर मराठी भाषा बोलणे गरजेचे आहे - राज ठाकरे 

मराठी भाषा दिवस दररोज का साजरा करू नये? असा परखड सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. पुण्यभूषण फाऊंडेशनच्या वतीनं सर्वोत्तम दिवाळी अंक पुरस्कार वितरण सोहळा राज ठाकरेंच्या हस्ते उपस्थितीत पार पडला. 

त्यावेळी ते बोलत होते. 'मराठी भाषा मरेल हा टाहो किती दिवस फोडायचा? हिंदीत का बोलायचं? प्रत्येकानं मराठीचा आग्रह धरला पाहिजे आणि अभिमान बाळगला पाहिजे, असं आवाहन राज ठाकरेंनी यावेळी केलं.

कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान आहे. त्यांनी मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली.

आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला.

21 जानेवारी 2013 पासून कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.