मराठा आरक्षण : खासदार-आमदारांच्या घरासमोर झोपमोड आंदोलन

मराठा आरक्षणासाठी खासदार-आमदारांच्या घरासमोर झोपमोड आंदोलन करण्यात आलं.  

Updated: Aug 3, 2018, 09:38 PM IST
 मराठा आरक्षण : खासदार-आमदारांच्या घरासमोर झोपमोड आंदोलन  title=

अकोला : मराठा आरक्षणासाठी खासदार-आमदारांच्या घरासमोर झोपमोड आंदोलन करण्यात आलं. खासदार संजय धोत्रे आणि आमदार रणधिर सावरकर यांच्या रामनगरातील घरासमोर हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी ‘गोंधळ’ घालून आरक्षण देण्याची मागणी केली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. 

अकोल्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी मराठ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मुख्यमंत्र्यांना जिल्हा बंदी करण्याचा ठराव मंजूर केला. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चानं त्यांचा रोख जिल्ह्यातील मराठा समाजाचे खासदार, आमदारांकडे वळवलाय. समाजाच्या लोकप्रतिनिधींनी आरक्षणाच्या मुद्यावर शासनाकडे ठोस भूमिका मांडण्यासाठी क्रांती मोर्चा आग्रही आहे.