जरांगे पाटील आणि भुजबळ वाद विकोपाला! भाषेचा दर्जा घसरला; समाजावर काय होणार परिणाम?

Jarange and Bhujbal Dispute:

Pravin Dabholkar | Updated: Jun 22, 2024, 09:29 PM IST
जरांगे पाटील आणि भुजबळ वाद विकोपाला! भाषेचा दर्जा घसरला; समाजावर काय होणार परिणाम?  title=
Jarange VS Bhujbal

Jarange and Bhujbal Dispute: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातला वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे.. मात्र मागील काही दिवसांपासून हा वाद विकोपाला गेल्याचं पाहायला मिळतंय. आम्ही कुणाला धमकी देत नाही.. आणि कुणी धमकी दिली तर हम किसी के बापसे डरते नही है... अशा शब्दांत मंत्री छगन भुजबळांनी शेरोशायरी करत जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला... तर आम्ही देखील मेलेल्या आईचं दूध प्यालेलो नाही, असा पलटवार जरांगेंनी केला. आरक्षणाच्या वादात नेत्यांच्या भाषेचा दर्जा घसरत असल्याचे निदर्शनास येतंय. 

मराठा ओबीसी आंदोलनावरून सध्या राज्याचं राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालंय... मराठ्यांना ओबीसींमध्ये आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे यांचा संघर्ष सुरू आहे.. तर दुसरीकडे मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या.. ओबीसीमध्ये नको अशी भूमिका मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांची आहे.. त्यावरून या दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतायत.. मनोज जरांगे पाटील यांनी थेट छगन भूजबळ यांना राजकीय करियर मधून उठवण्याचा इशारा दिला.. तर भुजबळांनीही जरांगेंवर जोरदार पलटवार केलाय..

दरम्यान कुणबी नोंदींवरूनही जरांगे आणि भुजबळांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं.. भुजबळांच्या सांगण्यावरून आमच्या नोंदी खोट्या ठरवू नका...नोंदी खोट्या ठरवणं सरकारला परवडणारं नाही असा इशारा जरांगेंनी दिलाय... यावरून भुजबळांनी जरांगेंवर निशाणा साधलाय.. चुकीचं प्रमाणपत्र देणारा आणि घेणारा गुन्हेगार असल्याचं भुजबळांनी म्हटलंय.

आम्ही कुणाला धमकी देत नाही मात्र आम्हाला कुणी धमकी दिली तर हम किसी के बापसे डरते नही है.. अस म्हणत छगन भुजबळ यांनी वडीगोद्रीमधून जरांगे पाटलांवर हल्लाबोल केलाय.. तर आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलेलो नाही, अशा शब्दांत जरांगेंनी भुजबळांचा हल्ला परतवला.

मनोज जरांगे मराठा समाजासाठी तर छगन भुजबळ हे ओबीसी समाजासाठी मैदानात उभे ठाकलेत...मात्र आपल्या समाजाची बाजू मांडताना या नेत्यांच्या भाषेचा दर्जा मात्र दिवसेंदिवस घसरताना दिसतोय.. आपण काय बोलायला हवं, कसं बोलायला हवं, त्याचा समाजावर काय परिणाम होईल याचा विचार प्रत्येकानं करणंही तितकंच गरजेचं आहे.

जरांगेंची प्रकृती खालावली 

मनोज जरांगे यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांच्यावर संभाजीनगरमध्ये उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनी त्यांना पुन्हा सलाईन लावलं असून, 2 D इको, ECG सह, त्यांच्या इतरही तपासण्या केल्या जाताहेत. त्यांना कालपासून अस्वस्थ वाटत असल्याचं सांगण्यात आलंय.