पुराच्या पाण्यात बुडून एकाचा मृत्यू

बंधाऱ्यावरुन जात असताना पाय घसरून पडले नदीत

Updated: Jul 8, 2018, 10:49 AM IST
पुराच्या पाण्यात बुडून एकाचा मृत्यू title=

पालघर : पुराच्या पाण्यात बुडून एकाचा मृत्यू झाला आहे. बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. बारकया पांडु शिंगडा या 56 वर्षीय व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला आहे. डहाणू तालुक्यातील कळमदेवी नदीच्या बंधाऱ्यावरुन जात असताना पाय घसरून नदीत पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाला आहे.