आंगणेवाडी भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख जाहीर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी मालवण येथील प्रसिद्ध भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे.  

Updated: Dec 18, 2018, 10:40 PM IST
आंगणेवाडी भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख जाहीर title=

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी मालवण येथील प्रसिद्ध भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानुसार सोमवार २५ फेब्रुवारी २०१९ ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.

आंगणेवाडीची यात्रा कधी होणार याकडे सर्व राज्याचे आणि भक्तांचे लक्ष लागले होते. यावर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण्यांचा जागर येथे पाहावयास मिळेल. आंगणेवाडी देवीची ख्याती सर्वदूर पसरलेल्या लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. 

आज १८ डिसेंबर रोजी सकाळी आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक झाल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली. मालवण येथील आंगणेवाडी यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली. त्यानुसार सोमवारी २५ फेब्रुवारी २०१९ ला यात्रा होणार आहे.