Thane news: ठाण्यात मोठी दुर्घटना; इमारतीच्या पत्र्याची शेड टर्फवर कोसळून 6 जण जखमी

Thane news: रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली आहे. ठाण्यातील रौनक पार्क, बी 2 इमारतीच्या छतावरील पत्र्याची शेड बाजूला असलेल्या ठा. म.पा. टर्फ पार्क, फुटबॉल ग्राउंड वरती कोसळली. गावंड बाग या ठिकाणी फुटबॉल टर्फवर मुलं फुटबॉल खेळत होते. 

सुरभि जगदीश | Updated: Jun 22, 2024, 08:16 AM IST
Thane news: ठाण्यात मोठी दुर्घटना; इमारतीच्या पत्र्याची शेड टर्फवर कोसळून 6 जण जखमी title=

Thane news: शुक्रवारी संध्याकाळी ठाण्यामध्ये एक मोठी दुर्घटना घडली. इमारतीचा पत्रा कोसळल्याने 6 मुलं जखमी झाली आहेत. इमारतीचा पत्रा फुटबॉल टर्फवर पडल्याची घटना घडली आहे. यावेळी पत्रा पडून मुलांना गंभीर दुखापत झाली आहे. ठाण्यातील गावंड बाग परिसरात एका इमारतीचा पत्रा उडून खाली असलेला फुटबॉल टर्फवर पडल्याचं समोर आलं. दरम्यान यावेळी त्या टर्फमध्ये खेळत असलेली 6 मुलं जखमी झाली आहेत.

रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली आहे. ठाण्यातील रौनक पार्क, बी 2 इमारतीच्या छतावरील पत्र्याची शेड बाजूला असलेल्या ठा. म.पा. टर्फ पार्क, फुटबॉल ग्राउंड वरती कोसळली. गावंड बाग या ठिकाणी फुटबॉल टर्फवर मुलं फुटबॉल खेळत होते. दरम्यान याचवेळी ही दुर्घटना घडल्याने खेळत असलेल्या मुलांना गंभीर दुखापत झाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास फुटबॉल टर्फवर सर्व मुलं खेळत होती. यावेळी जोरदार पाऊस सुरु झाला, त्यासोबत सोसोट्याचा वारा सुरु झाला. जोरदार वाऱ्यामुळे बिल्डिंगवरचा पत्रा खाली कोसळला. पत्रा टर्फवर कोसळल्यामुळे या 6 जणांना दुखापत झाली. यावेळी जखमी मुलांवर रूग्णालयात उपचार सुरु आहेत. 

जखमी झालेल्या 6 जणांवर ठाण्याच्या बेथनी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. फुटबॉल टर्फमध्ये एकूण 17 विद्यार्थी खेळत होते. त्यावेळी मुसळधार पावसामुळे रौनक पार्क फेस 2 च्या इमारतीवरील पत्र्याची शेड टर्फवर कोसळली. या दुर्घटनेत 15 वर्षांचे 6 खेळाडू जखमी झालेत. यातील 3 जणांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला असून, पत्र्याच्या शेडखाली विद्यार्थी अडकलेले दिसतायत. तातडीने त्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याबाबत पोलिसांत तक्रारही करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करतायत.