Ram Navami 2023 : शिर्डीमधील रामनवमी उत्सवात मोठी दुर्घटना; यात्रेतील पाळणा निसटून 4 जण जखमी

Ram Navami 2023 : शिर्डीत या रामनवमी यात्रेत पाळण्याचा अपघात झाला. यात्रेतील पाळणा निसटून चार जण जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असून, इतर तिघांनाही मोठी दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. 

Updated: Apr 1, 2023, 09:46 PM IST
Ram Navami 2023 : शिर्डीमधील रामनवमी उत्सवात मोठी दुर्घटना; यात्रेतील पाळणा निसटून 4 जण जखमी title=

Shirdi Ram Navami 2023 : साईबाबांच्या शिर्डीत रामनवमी उत्सव मोठ्या जल्लोषात आणि भक्तीभावाने साजरा केला जातो. हजारो भाविक रामनवमी (Ram Navami ) उत्सवासाठी शिर्डीत (Shirdi ) दाखल होतात. यंदा मात्र, शिर्डीतल्या रामनवमी उत्सवा दरम्यानच्या अपघाताची घडली आहे.  पाळणा निसटून 4 जण जखमी झाले आहेत.

शिर्डीत या रामनवमी यात्रेत पाळण्याचा अपघात झाला. यात्रेतील पाळणा निसटून चार जण जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असून, इतर तिघांनाही मोठी दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यांच्यावर साईबाबा संस्थानच्या रूग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातामुळे एकच खळबळ उडाली आहे.

रामनवमी उत्सवात साई चरणी एक कोटीहून अधिक दान

रामनवमी उत्सवात शिर्डीत साईचरणी एक कोटीहून अधिक दान अर्पण करण्यात आलंय. तीन दिवसातच संस्थानाला एकूण 4 कोटी 9 लाख रुपयांचं दान प्राप्त झाल आहे. यात दानपेटीत 1 कोटी 81 लाखांची रक्कम जमा झालीय. 171 ग्रॅम सोनं, 713 ग्राम चांदीही अर्पण करण्यात आली आहे. डेबीट , क्रेडीट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक , डिडी आणि मनी ऑर्डर आदींव्‍दारे 1 कोटी 41 लाख 52 हजार 812 रुपयांच दान प्राप्त झाले. यासोबत 8 लाख 64 हजारांचे 171 ग्राम सोने तर 1 लाख 21 हजार 813 रुपये किमतीची 2 किलो 713 ग्राम चांदीही अर्पण करण्यात आली आहे. या दाना व्‍यतिरिक्‍त उत्‍सव काळात सशुल्‍क तसेच ऑनलाईन पासेस व्‍दारे एकुण 61 लाख 43 हजार 800 रुपयांचे उत्पन्न संस्थानला प्राप्त झाल्याची माहीती संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव‌ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

साईभक्तांमध्ये हाणामारी

शिर्डीत साई संस्थानचे सुरक्षारक्षक आणि साईभक्तांमध्ये हाणामारी झाली आहे.  साईमंदिराचे प्रवेशद्वार क्रमांक पाचच्या बाहेर तुंबळ हाणामारी झाली. मुंबईच्या पालखीतील साईभक्त आणि सुरक्षारक्षकांची फ्री स्टाईल हाणामारी केली. हाणामारीचा व्हिडीओ समोर आला आहे. सुरक्षा रक्षकांनी संबंधितांना मंदिर परिसरात जाण्यास मज्जाव करत ढकलून दिल्याने वाद झाल्याचे समजते. वादाचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले. राहीलेली पिशवी घेऊन येण्यासाठी आत जाण्यास भाविकाला मज्जाव केला यावरुन हा वाद झाल्याचे समजते. हाणामारीचे कारण मात्र, अद्याप अस्पष्ट आहे.