Maharastra Politics: सत्ताधारांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार; अधिवेशनाआधी अजितदादांची चौफेर टीका!

Ajit pawar Winter Session: मुख्यमंत्र्यांनी आयोजीत केलेला चहापान कार्यक्रमात उपस्थित राहणे योग्य वाटत नाही, असा निर्णय सर्व विरोधीपक्षाने घेतल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

Updated: Dec 18, 2022, 03:41 PM IST
Maharastra Politics: सत्ताधारांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार; अधिवेशनाआधी अजितदादांची चौफेर टीका! title=
Winter Session Ajit pawar

Maharashtra Winter Session: राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन (Winter Session In Nagpur) उद्यापासून सुरु होणार आहे. सत्ताधाऱ्यांकडून महापुरुषांबाबत कथित अवमानकारक वक्तव्य, कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद, महाराष्ट्राच्या हातून गेलेले प्रकल्प, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, वाढती महागाई, बेरोजगारी या विषयांमुळे राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन चांगलंच वादळी होण्याची शक्यता आहे. अशातच आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत (Maharashtra Political News)  अधिवेशनाआधी जोरदार हल्लाबोल केला आहे. (Maharastra Politics Opposition boycotts ruling partys tea party in Winter Session Criticism of Ajit pawar marathi news)

अजित पवारांनी चौफेर टीकास्त्र सोडलं. अनेक महत्त्वाचे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले. त्यामुळे अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना (Maharastra Farmers) मदत देण्यात आली नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप अजित पवार (Criticism of Ajit pawar) यांनी यावेळी केला आहे.
 
मुख्यमंत्र्यांनी आयोजीत केलेला चहापान कार्यक्रमात उपस्थित राहणे योग्य वाटत नाही, असा निर्णय (Opposition boycotts ruling partys tea party) सर्व विरोधीपक्षाने घेतल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. तीन आठवड्याचं अधिवेशन घ्या, अशी मागणी देखील विरोधी पक्षाने केली आहे.

आणखी वाचा - मविआच्या मोर्चात पैसे वाटून जमवली गर्दी? अजित पवार म्हणाले, "मी लोकांसोबत..."

दरम्यान, महापुरुषांबाबत सत्ताधाऱ्यांकडून बेताल वक्तव्य केली जात आहे. आम्ही ज्योतिषी नाही आणि ज्योतिषाकडे जातही नाही, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना टोला लगावला. नाकाखालून सरकार काढलं त्यात नाक खूपसणार नाही, असंही अजित पवार (Ajit Pawar) यावेळी म्हणाले आहेत.