IMD Alert : हवामान खात्याचा धोक्याचा इशारा ! राज्यात 'या' ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता

राज्यात पुढील दोन दिवस काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. हवामान खात्याने हा अलर्ट जारी केला आहे. 

Updated: Jul 20, 2023, 07:04 PM IST
IMD Alert : हवामान खात्याचा धोक्याचा इशारा ! राज्यात 'या' ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता  title=

Maharashtra Monsoon Update :  पावसासंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. राज्यात पुढचे दोन दिवस काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.  कोकण आणि घाटात जोरदार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे.  विजांच्या कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

उत्तर पश्चिम बंगालची खाडी आणि ओरिसा किनारपट्टीवर तयार झालेय कमी दाबाचे क्षेत्र 

मागील दोन दिवसांपासून राज्यातील विविध ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे.  हवामान विभागाच्या अंदाजानुसार कमी दाबाचा पट्टा हा 20 डिग्री नॉर्थ ला असून सामान्य परिस्थितीती पेक्षा दक्षिणेकडे झुकलेला आहे. उत्तर पश्चिम बंगालची खाडी आणि ओरिसा किनारपट्टी वर कमी दाबाचा क्षेत्र तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात पाऊस पडत असून पुढील दोन दिवस राज्यातील कोकण गोवा तसेच मध्य महाराष्ट्रात घाट विभागात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे.

22 ते 24 जुलै दरम्यान अतीवृष्टीचा इशारा 

हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण गोवा याठिकाणी पुढील दोन दिवस बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर, गोवा महाराष्ट्र किनारपट्टी वर सोसायट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.तर 22 ते 24 जुलै पर्यंत बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.  गोवा महाराष्ट्र किनारपट्टी वर सोसायट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.  घाट विभागात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच 22 ते 24 जुलै पर्यंत बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.तर घाट विभागात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाड होण्याची शक्यता आहे.तर विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाड होण्याची शक्यता आहे.