विधानसभा महासंग्राममध्ये नागपुरातील 12 मतदारसंघांचं राजकीय गणित काय? कोण वर्चस्व गाजवणार 23 नोव्हेंबरला होणार स्पष्ट

Maharashtra Vidhan Sabha Election : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून दिवाळीनंतर 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी असणार आहे. लोकसभा निवडणुकीत विदर्भात महायुतील फटका बसला होता, आता विधानसभेत कोण वर्चस्व गाजवणार पाहवं लागणारय. 

नेहा चौधरी | Updated: Oct 15, 2024, 05:13 PM IST
विधानसभा महासंग्राममध्ये नागपुरातील 12 मतदारसंघांचं राजकीय गणित काय? कोण वर्चस्व गाजवणार 23 नोव्हेंबरला होणार स्पष्ट  title=
maharashtra vidhan sabha election 2024 nagpur 12 assembly Who will dominate on November 23 will be clear

Maharashtra Assembly Election : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारख्या जाहीर केल्या आहेत. आजपासून (15 ऑक्टोबर मंगळवार) आचारसंहिता लागू झाली आहे. दिवाळीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी ((Maharashtra Vidhansabha Election 2024)) राज्यात 20 नोव्हेंबर (बुधवार) ला (Maharashtra Vidhan Sabha Election Dates) मतदान होणार आहे. तर महाराष्ट्राचं भवितव्य हे 23 नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे. अनेक राजकीय भूकंपामुळे यंदाची विधानसभा निवडणूक चुरशीची होणार आहे, यात प्रश्नच नाही. 

लोकसभा निवडणुकीवर एक नजर टाकली तर राज्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. 13 खासदारांसह काँग्रेस राज्यात आणि महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) सर्वात मोठा पक्ष ठरलाय. खास करुन विदर्भात काँग्रेसने अनेक वर्षांनंतर जोरदार कमबॅक केल्याच पाहिला मिळालं. 10 पैकी 7 जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवाऱ्यांनी विजयाचे पताका फडकवल्यात. तर भाजप आणि शिंदेला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानवं लागलं. त्यामुळे विधानसभेमध्ये नागपुरात भाजपला चांगलीच कंबर कसावी लागणार आहे. 

2019 मधील मतदारसंघातील राजकीय गणित!

काटोल विधानसभा

काटोल विधानसभा मतदारसंघातून 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांनी तब्बल 94 हजार मतं मिळव विजय मिळवला. त्यांनी भाजपचे चरणसिंग ठाकूर यांना पराभूत करून आपला विधानसभा मतदारसंघ पुन्हा काबीज केला होता. सलग चारवेळा काटोल सर करणारे माजी गृहमंत्री तसंच राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल देशमुख यांच्याविरुद्ध भाजपने त्यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तसंच काटोलचे माजी नगराध्यक्ष चरणसिंग ठाकूर यांना उमेदवारी दिली होती. 

 

हेसुद्धा वाचा - Katol Vidhan Sabha Nivadnuk 2024 : विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुख बालेकिल्ला राखणार का? तुमच्या मतदारसंघाचं गणित जाणून घ्या

 

सावनेर विधानसभा

सावनेर विधानसभा मतदारसंघातून 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांनी दणदणीत विजय मिळवला होता. सावनेर मतदारसंघात सुनील केदार विरुद्ध भाजपने डॉ. राजीव पोतदार यांना उमेदवारी देऊन ही लढत अधिक प्रतिष्ठेची केली होती. मात्र यात केदार यांनी 20 हजार 227 अधिक मतांनी विजय मिळवला होता. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार यांना या पराभवाला समोर जावं लागलं होतं. 

हिंगणा विधानसभा

हिंगणा विधानसभा मतदारसंघात सलग तीन टर्म भाजपाचे वर्चस्व आहे. 2019 साली सलग दुसऱ्यांदा समीर मेघे यांना उमेदवारी देण्यात आली होती. यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पांडुरंग विजयबाबू घोडमारे यांचा 46 हजार 167 मतांनी पराभव करून विजय मिळवला होता. हिंगणा विधानसभा क्षेत्रावर एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांचे वर्चस्व होते. मात्र भाजपने (BJP)सन 2009 मध्ये प्रथमच तत्कालीन आमदार विजय घोडमारे यांच्या रूपाने पहिल्यांदा मतदार संघात भाजपने प्रवेश केला. यानंतर आमदार समीर मेघे (MLA Sameer Meghe) आपल्या विकासकामांच्या जोरावर आपला विजयी रथ कायम गतिमान ठेवलाय.

उमरेड विधानसभा

रामटेक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांचा पराभव झाल्याने भाजपची नामुष्की झालीय. कधीकाळी काँग्रेसमध्ये असलेले आणि 2019 मध्ये काँग्रेसकडून उमरेड विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले राजू पारवे यांचा मात्र 2024 चा लोकसभेत पराभवाचा सामना करावा लागला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत उमरेड विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुधीर पारवे यांच्या विरोधात काँग्रेसचे राजू पारवे विजयी झाले होते. काँग्रेसचे राजू पारवे यांनी भाजपचे सुधीर पारवे यांचा 18 हजार 26 मतांनी पराभव केला होता. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिंदे गटात प्रवेश करत लोकसभा निवडणूक लढवली. त्यात मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा

नागपूर विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने सर्वत महत्वपूर्ण आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा मतदारसंघ आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून 2019 साली सलग पाचव्यांदा विजय मिळवला आहे. असं असले तरी 2019साली फडणवीस यांनी नागपूर दक्षिण पश्चिममधून मिळवलेला विजय तितकासा समाधानकारक राहिला नाही. मुख्यमंत्रीपदावर असल्यामुळे फडणवीस यांना एका लाखापेक्षा जास्त मताधिक्क्याने विजय मिळवू असा विश्वास होता. पण काँग्रेस उमेदवार आशिष देशमुख यांच्याविरोधात फडणवीसांनी अवघे 49, 482 मतांनी विजय मिळवला होता. तर लगतच्या उत्तर नागपूरमधून काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत आणि नागपूर पश्चिममधून विकास ठाकरे यांनी विजय मिळवला होता.

नागपूर जिल्ह्यातील आमदार 

काटोल विधानसभा - अनिल देशमुख (राष्ट्रवादी- शरद पवार)

सावनेर विधानसभा -  सुनील केदार (काँग्रेस)

हिंगणा विधानसभा - समीर मेघे (भाजप)

उमरेड विधानसभा - राजू पारवे (काँग्रेस) - सध्या शिवसेना एकनाथ शिंदे

नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा-  देवेंद्र फडणवीस (भाजप)

नागपूर दक्षिण विधानसभा - मोहन मते  (भाजप)

नागपूर पूर्व विधानसभा - कृष्णा खोपडे (भाजप)

नागपूर मध्य विधानसभा - विकास कुंभारे (भाजप)

नागपूर पश्चिम विधानसभा - विकास ठाकरे (काँग्रेस)

नागपूर उत्तर विधानसभा - नितीन राऊत (काँग्रेस)

कामठी विधानसभा - टेकचंद सावरकर (भाजप)

रामटेक विधानसभा - आशिष जयस्वाल (अपक्ष)