Maharashtra Rain: राज्यभरात परतीचा पाऊस धोधो कोसळतोय. या पावसामुळे राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीकाचे मोठे नुकसान झाले आहे. ठाणे, नाशिक, अकोला, भंडारा येथे भातशेतीचं नुकसान झालंय. याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. ठाणे जिल्ह्यात गेल्या आठवडा पडलेला परतीच्या पावसामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत . जिल्ह्यातील हजारो हेक्टर जमीन भात लागवडी खाली आहे . यातील 80 ते 90 टक्के शेतीचे या परतीच्या पावसामुळे नुकसान झाले आहे . परतीच्या पावसाने भातपिकाला चांगलेच झोडपून काढले असून वादळी वाऱ्या मुळे शेतातील उभे पीक आडवे झाले अजून शेतात गुडघाभर पाणी साचल आहे , त्यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून शेतकरीराजा संकटात सापडला आहे . त्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत
रात्री ढगफुटी सारखा झालेल्या पावसामुळे चांदवड तालुक्यात प्रचंड नुकसान झाले असून पिकासह सर्वात जास्त फटका राहूडसह इतर 10 ते 12 गावांना बसला आहे. बांधरा आणि पाझर तलाव फुटल्यामुळे पिकासह शेती वाहून गेली, अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहे.
नाशिक जिल्ह्यात काल सायंकाळपासून रात्री उशिरा पर्यंत झालेल्या परतीच्या अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली..विशेषतः चांदवड तालुक्यातील वडबारे, राहुड या भागात ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्याने कांदा शेती पिकांचे मोठे नुकसान झाले..मोठ्या प्रमाणात झालेल्या या पावसाने नदी, नाले भरून वाहू लागले..परिसरातील शेतात पाणी शिरल्याने शेतजमीन अक्षरश खरडून निघाल्या, तर लागवड केलेले कांदे मुळासकट वाहून गेले..कांदा, सोयाबीन,.मका या पिकांसह फळबागांना ही मोठा फटका या पावसाचा बसला आहे.. आधीच कांदा सध्या महागला आहे येणार कांदा पीक कमी झाल्यानंतर याचा फटका शेतकऱ्याला बसेल
काल रात्री आलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीपात्रात पाण्याची वाढ झाली यामुळे गोदा घाट परिसरात असलेल्या पार्किंग मधून कार वाहून थेट गोदावरी नदी पात्रात अडकली आहे... नागपूर वरून आलेल्या कुटुंबाची ही गाडी आहे देवदर्शनासाठी आल्यानंतर गाडी गोदा घाट परिसरामध्ये पार्क केली आणि रात्री आलेल्या पावसामुळे गोदावरी नदी पाणी पातळीत वाढ झाली आणि याचा परिणाम ही कार वाहत थेट गोदावरी नदीपात्रात अडकलीये.
अकोला जिल्ह्यात काल अवकाळी पाऊस झालाय.विजांच्या कडकडाटासह धुव्वाधार झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले होते.. संध्याकाळी ५.३० ते रात्री ८.३० या तीन तास बरसलेल्या पावसात तब्बल ४८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आलीय..जुन्या शहरातील विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले होते..शहरात या पावसाने दाणादाण उडवली , तर या पावसामुळे शेतात सोंगून ठेवलेले सोयाबीन भिजले असल्याने शेतमालाचे उत्पादन आणखी घटणार आहेय..जिल्ह्यात आणखी काही दिवस पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या नागपूर येथे प्रादेशिक कार्यालयाने वर्तवला आहेय...
भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यात काल सायंकाळच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान झाला आहे. शेतकऱ्यांनी धान पीक कापून ठेवलेली आहेत. तर काही धान उभे असल्याने हातात तोंडाची आलेला घास हिरावला गेला आहे. या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांची कडपे पाण्यामुळे खराब झाली आहेत. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर अस्मानी संकटामुळे आता शेतकरी हतबल झाला असून कृषी विभागाने पंचनामा करून तात्काळ मदत द्यावी अशी मागणी आता शेतकरी करू लागले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये काकडीचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जात आहे. सोलापूरच्या काकडीला पुणे , मुंबईसह इतर राज्यातून देखील मागणी वाढत आहे . सध्या सोलापुरात 18-20 रुपये , पुणे 22 ते 25 रुपये प्रति किलो शेतकऱ्यांना काकडीचा दर मिळत आहे. अवकाळी ,गारपीट, परतीचा पाऊस यावर मात करत शेतकऱ्यांनी पीक जगवलं. त्यामुळे शेतकऱ्यांना 28-30 रुपये प्रतिकिलोचा भाव मिळण्याची अपेक्षा आहे .नगदी पिकं म्हणून ओळख असलेल्या मसाला वर्गीकरण हळदीला मागील काही वर्षापासून मिळत असलेल्या उच्चांकी दरामुळे वाशिम जिल्ह्यात काही शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांना बगल देत हळदीची लागवडीकडे वळाले आसून वाशिम जिल्ह्यात मागील खरीप हंगामात हळदीला प्रती क्विंटल १५ हजारांपेक्षा अधिक दर मिळाल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड केली आहे.जिल्ह्यात विविध भागांत हळदीचे पीक चांगले वाढले असून शेतकऱ्यांना भरघोस उत्पादनाची अपेक्षा आहे.हळदीचे पीक चांगले बहरले असून यंदाच्या हंगामात चांगला आर्थिक लाभ होण्याची आशा शेतकऱ्यांना आहे.यावर्षी जिल्ह्यात ८ हजार २०० हेक्टरवर हळदीची पेरणी झाली आहे.मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १ हजार ९५० हेक्टरने वाढ झाली आहे.