मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांचा आकडा सहा हजाराच्या वर गेला आहे. आज राज्यात कोरोनाचे ६४०६ नवे रूग्ण सापडले आहेत. तर राज्यात ६५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज राज्यात ४८१५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात एकूण १६६८५३८ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.५७% इतका आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १०५४७३३३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८०२३६५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५२८६९० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ६६३४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ओरडते. मुंबईत १४१८५ रुग्ण ऍक्टिव आहेत तर ठाणे १५५३३ कोरोनाबाधित रुग्ण ऍक्टिव आहेत. पुण्यात ऍक्टिव कोरोनाबाधितांचा आकडा हा १८८८७ इतका आहे.
Maharashtra reports 6,406 new COVID-19 cases, 4,815 recoveries, and 65 deaths today, as per State Health Department
Total cases: 18,02,365
Total recoveries: 16,68,538
Active cases: 85,963
Death toll: 46,813 pic.twitter.com/BdRs62zAUw
— ANI (@ANI) November 26, 2020
देशात आणि संपूर्ण जगभरात थैमान घालणाऱ्या coronavirus कोरोना व्हायरच्या प्रादुर्भावानं मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातही चिंचा वाढवली आहे. दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं नागरिक घराबाहेर पडले आणि काही अंशी झालेल्या बेजबाबदार वर्तनामुळं पुन्हा एकदा काहीसा नियंत्रणात येणारा कोरोना फोफावला.
#CoronavirusUpdates
26-Nov; 6:00pmDischarged Pts. (24 hrs) - 548
Total Recovered Pts. - 2,54,152
Overall Recovery Rate - 91%Total Active Pts. - *11,697
Doubling Rate - 196 Days
Growth Rate (19 Nov-25 Nov) - 0.35%#NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) November 26, 2020
प्रशासन एकिकडे काही निर्बंध पुन्हा लागू करत कोरोनापासून नागरिकांना दूर ठेवण्याच्या तयारीत असतानाच नव्या कोरोना बाधितांचा आकडा आणखी आव्हानं उभी करताना दिसला. पण, त्यातच सोमवारी एक दिलासादायक वृत्त हाती आलं. ते म्हणजे कोरोनामुळं दगावणाऱ्या रुग्णसंख्येबाबतचं.