४८ तासांत विदर्भ-मराठवाड्यातही पावसाची तीव्रता वाढणार

Updated: Jun 26, 2018, 10:13 AM IST

मुंबई : येत्या २४ तासांत उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केलीय. तर ४८ तासांनंतर मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत पावसाची तीव्रता आणखी वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.  मध्य-महाराष्ट्रातील जळगाव, अहमदनगर आणि नाशिक या  जिल्ह्यांत पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.. या काळात  ढगाळ वातावरणामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमानात घट होणार आहे. या आठवड्यात मध्य-भारतात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचे संकेत असल्याने विदर्भ आणि मराठवाड्यात चांगल्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.