नाणार प्रकल्प करारावर स्वाक्षऱ्या

नाणार प्रकल्पात विरोधाची धग कायम असताना मात्र...

Updated: Jun 26, 2018, 09:39 AM IST

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार प्रकल्पात विरोधाची धग कायम असताना दिल्लीत मात्र ग्रीन फिल्ड रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्पाची निर्मीती आणि विकासासाठी अबू धाबी नॅशनल ऑईल कंपनी  म्हणजेच एडनॉकने करारावर स्वाक्षरी केली आहे. नवी दिल्लीत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीती स्वाक्षरी करण्यात आल्या.  या संपूर्ण प्रकल्पात आता भारतीय तेल कंपन्या, सौदी अरमको आणि एडनॉक या विदेशी कंपन्यामध्ये ५० - ५० टके भागिदारी निश्चित करण्यात आली आहे. चार हजार चारशे कोटीचा हा प्रकल्प २०२५ पर्यंत पूर्णत्वास जाईल अशी शक्यता आहे. नाणार हा प्रकल्प केवळ देशातीलच नसून जगातील सर्वात मोठा रिफायनरी आणि पेट्रोलियम प्रकल्प असून वर्षाला सहा कोटी टनाचं उत्पादन होणार आहे.