Maharashtra Politics : आम्हाला चॅलेंज करू नका; गुलाबराव पाटील यांचा संजय राऊत यांना थेट इशारा

Maharashtra Politics : आम्ही दगड मारून सभा बंद करणारे आम्हाला चॅलेंज करू नका असा  थेट इशाराच गुलाबराव पाटलील यांनी संजय राऊत यांना दिला आहे. 

Updated: Apr 22, 2023, 10:02 PM IST
Maharashtra Politics : आम्हाला चॅलेंज करू नका; गुलाबराव पाटील यांचा संजय राऊत यांना थेट इशारा title=

Sanjay Raut Vs Gulabrao Patil : सध्या राज्यभर महाविकासआघाडीतर्फे वज्रमुठ  सभेचे आयोजन केले जात आहे. या सभेआधीच ठाकरे आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये जुंपली आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटातील कलगितुरा संपायला काही तयार नाही. दोन्ही बाजूनं रोज आव्हान-प्रतिआव्हानाची भाषा सुरूच आहे. मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) टीकेला उत्तर देत सभेत घुसून दाखवण्याचं आव्हान संजय राऊतांनी (Sanjay Raut) गुलाबराव पाटील यांना दिले आहे (Maharashtra Politics). 

उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी जळगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री गुलाबराव पाटलांवर जोरदार घाणाघात केला होता दरम्यान आम्ही दगड मारून सभा बंद करणारे त्यामुळे संजय राऊत यांनी आम्हाला चॅलेंज करू नये असे थेट प्रत्युत्तर मंत्री गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांना दिले आहे. 

तर, संजय राऊत आमच्या मतावर खासदार झाले असून दम असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा व पुन्हा खासदार होऊन दाखवावं असं थेट आवाहन गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांना दिले आहे. संजय राऊत यांच्यासारख्या नतदृष्ट लोकांनी शिवसेनेची वाट लावली असून त्यामुळे त्यांना आमचा कायम विरोध असून आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक त्यामुळे राऊतांनी आम्हाला अक्कल शिकू नये असा थेट हल्लाबोलही गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवर केला आहे.

उद्धव ठाकरेंच्या सभेत घुसणारच

जळगावात उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी राजकीय वातावरण तापल आहे. काहीही झालं तरी उद्धव ठाकरेंच्या सभेत घुसणारच असा पवित्रा गुलाबराव पाटलांच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. त्यासाठी गुलाबराव पाटलांचे कार्यकर्ते गुप्त बैठका घेत आहेत.संजय राऊत आणि ठाकरे गटाकडून गुलाबराव पाटलांचा अपमान सहन करणार नाही असा निर्धारही गुलाबरावांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. 

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत हे जळगावमध्ये दाखल झालेत. उद्या रविवारी उद्धव ठाकरेंची पाचोरा येथे जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी राऊत जळगावात गेले असता, गुलाबराव पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान कार्यकर्त्यांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतलं.