'लोकसभा निवडणुकीत सोलापुरात दंगली घडवण्याचा कट होता' देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरात दंगली घडवायला सांगितलं होतं, असा गंभीर आरोप काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे.

Updated: Jun 15, 2024, 05:17 PM IST
'लोकसभा निवडणुकीत सोलापुरात दंगली घडवण्याचा कट होता' देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप title=

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadavis) यांनी सोलापुरात दंगली घडवायला सांगितलं होतं, असा थेट आणि गंभीर आरोप काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे (Pranit Shinde) यांनी केला. लोकसभा निवडणुकीत फडणवीसांचा सोलापुरात दंगली (Riots) घडवण्याचा कट होता. त्यासाठी निवडणुकीआधी 2 दिवस सोलापुरात दंगली घडवल्या जाणार होत्या, असा आरोप प्रणिती शिंदेंनी फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांवर केला. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर कृतज्ञता मेळाव्यात त्या बोलत होत्या. निवडणुकीत लोकांमध्ये विभागणी करा आणि निवडून या असं त्यांना सांगण्यात आलं होतं असं प्रणिती म्हणाल्या. 

दंगल घडवण्याचा कट
लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या पिलावळांचा सोलापुरात दंगली घडवण्याचा प्लॅन होता. दोन दिवस आधी दंगल लावणार होते सोलापुरात, भाजपवाल्यांना लाज वाटायला पाहिजे रक्ताने राजकारण करतात ही लोकं असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे. गावागावामध्ये जिल्ह्यात येऊन भांडण आणि दंगल लावण्याचा प्रयत्न करणार होते, भाजपवाल्यांना कळलं होतं निवडणूक आपल्या हातातून गेली आहे. आता एकच उपाय आहे दंगल लावा, निवडणुकीत लोकांमध्ये विभागणी करा असं त्यांना सांगण्यात आलं होतं, असंही प्रणिती शिंदे यांनी सांगितलं. त्यांची पाच दिवस अगोदरची भाषण काढून बघा, म्हणजे कळेल असा आरोपही खासदार प्रणिती शिंदेंनी केलाय.

नारायण राणे यांनी फेटाळले आरोप
दरम्यान, या आरोपात तथ्य नाही देवेंद्र फडणवीस असं करणार नाहीत, ते स्वत: गृहमंत्री आहेत, त्यामुळे हे आरोप निराधार असल्याचं खासदार नारायण राणे यांनी म्हटलं आहे. 

महायुतीत वाद
दुसरीकडे, महायुतीत आता मोठा भाऊ छोटा भाऊ वरून वाद होण्याची शक्यता निर्माण झालीये. लोकसभा निवडणुकीत आमचा स्ट्राईक रेट सर्वात चांगला होता आणि आम्हीच मोठा भाऊ आहोत...असा दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी केलाय..तर कोण शिरसाट असा प्रश्न विचारत खासदार नारायण राणे यांनी महायुतीतील नेत्यांनी संभाळून बोलावं असा सल्ला दिलाय..