Devendra Fadnavis : "सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीनंतर धनुष्यबाण.." - देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी मात्र खरी शिवसेना म्हणजे शिंद गटच असल्याचा दावा केलाय.  

Updated: Jul 30, 2022, 05:35 PM IST
Devendra Fadnavis : "सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीनंतर धनुष्यबाण.." - देवेंद्र फडणवीस title=

धुळे : सत्तास्थापनेनंतर एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर दावा केला. यावरुन शिवसेना आणि शिंदे गटात संघर्ष सुरु आहे. धनुष्यबाण शिवसेनेचा की शिंदे गटाचा याचा निर्णय हा 8 ऑगस्टला होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे.  याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिन्हाबाबत मोठं वक्तव्य केलंय.  न्यायालयातील सुनावणीनंतर धनुष्यबाण शिंदेंकडेच येईल, असा विशवास  फडणवीसांना व्यक्त केलाय. (maharashtra political crisis chief minister eknath shinde will get bow and arrow symbol say dcm devendra fadnavis at dondaicha) 

देवेंद्र फडणवीसांनी मात्र खरी शिवसेना म्हणजे शिंद गटच असल्याचा दावा करत त्यांनाच धनुष्यबाण चिन्ह मिळेल असं सांगितलंय. दोंडाईचा येथील सभेमध्ये ते बोलत होते. यावेळेस फडणवीस यांना चांदोली गदा आणि धनुष्यबाणाची भेट देण्यात आला.

फडणवीस काय म्हणाले?  

"आमचं समर्थन धनुष्यबाणासोबत एकनाथ शिंदे साहेबांना आहे. सर्वाधिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे तुम्ही दिलेला धनुष्यबाण मी त्यांच्या हातात देणार आहे. तसंच सर्व सुनावणी झाल्यानंतर निवडणूक आयोगाचा निकाल येईल. मला पूर्ण अपेक्षा आहे की, निवडणूक आयोगाच्या वतीने धनुष्यबाण त्यांच्याच हातात येईल", असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.