सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे सध्या नांदेड (Nanded) जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेत असून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. यावेळी एका आजीबाईंनी तक्रार मांडताच अजित पवारांनी कपाळावर हात मारला आहे. पंतप्रधान आवास योजनेत जिवंत व्यक्तीला मयत दाखवल्याची तक्रार आजीबाईंनी अजितदादांनी कपाळावर हात मारला आहे.
जिवंत व्यक्तीला मयत दाखवल्याची तक्रार एका आजीबाईने अजित पवार यांच्याकडे केल्यानंतर अजित पवारांनी आश्चर्य व्यक्त केलं. नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी मुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी अजित पवार करत होते. तेव्हा कारोडी गावातील एका आजीबाईनीं प्रधानमंत्री आवास योजनेत त्यांचे पती जिवंत असताना मयत दाखवल्याची तक्रार अजित पवारांकडे केली.
हा प्रकार ऐकून अजित पवारांनी आश्चर्य व्यक्त कर कपाळावरच हात मारला. आजीबाईंच्या तक्रारी नंतर अजित पवारांनी उपस्थितीत अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली व ती सोडवण्याची सूचना केली.
शाळेच्या दुरावस्थेबाबतही विद्यार्थ्यांची अजित पवारांकडे तक्रार
दरम्यान, शाळेच्या दुरावस्थेबाबतही विद्यार्थ्यांनी थेट अजित पवार यांना गाठत तक्रार केली. नांदेड जिल्ह्यातील करमोडी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीला गळती लागली आहे. तसेच शाळेत शौचालय आणि बसायला बाक नसल्याची तक्रार चिमुकल्यानी अजित पवारांच्या कानावर घातली. त्या नंतर जिल्हाधिकारी यांच्याशी याबाबतीत बोलून तुमच्या शाळेची समस्या सोडवतो असे आश्वासन अजित पवार यांनी मुलांना दिले.