NCP Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार अडचणीत आले आहेत. आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित ठिकाणांवर केंद्रीय तपास यंत्रणेने छापेमारी सुरु केली आहे. शुक्रवारी सकाळीच तपास यंत्रणेने पुणे, बारामती आणि इतर ठिकाणी छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. तपास यंत्रणेच्या पथकाने बारामती अॅग्रोची संबंधित एकूण सहा ठिकाणी धाड टाकल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. बारामती अॅग्रोवर केंद्रीय तपास यंत्रणेने धाड टाकल्याची माहिती समोर आल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. बारामती अॅग्रोवर ईडीने धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे. बारामती अॅग्रो कंपनी ही आमदार रोहित पवार यांची आहे.
शुक्रवारी सकाळी केंद्रीय तपास यंत्रणेने बारामती अॅग्रोवर धाड टाकली आहे. त्यामुळे आता रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्रीय तपास यंत्रणेकडून बारामती अॅग्रोसह सहा ठिकाणी झाडाझडती केली जात आहे. बारामती अॅग्रो या कंपनीत रोहित पवार हे कार्यकारी संचालक आणि त्यांचे वडील राजेंद्र पवार हे अध्यक्ष आहेत. केंद्राचे तपासणी पथक सकाळी दाखल झाल्यानंतर त्यांनी तपासणी सुरु केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या हे पथक ईडीचे आहे की कोणत्या दुसऱ्या तपास यंत्रणेचे याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही.