देशात मारबत मिरवणारे एकमेव नागपूर शहर! काय आहे मारबत परंपरा?

Marbat Festival 2024 : बैल पोळाच्या दुसऱ्या दिवशी विदर्भात तान्हा पोळा साजरा करण्यात येतो. त्यासोबत नागपुरात एक वेगळीवेगळी मिरवणूक निघते. ही वैभवशाली परंपरा आजही नागपुरात पाळली जाते. 

नेहा चौधरी | Updated: Sep 3, 2024, 03:43 PM IST
देशात मारबत मिरवणारे एकमेव नागपूर शहर! काय आहे मारबत परंपरा? title=
Maharashtra Festival Marbat Festival 2024 in Ngapur video

Marbat Festival 2024 in Ngapur :  'सगळं अशुभ,अमंगळ... घेऊन जा ऽऽ गे मारबत ऽऽऽ!'  या आरोळ्यांनी दरवर्षी 'तान्ह्या पोळ्या' च्या दिवशी  नागपुरातला महाल - इतवारी भाग दुमदुमुन जातो. मारबत!, हा सोहळा संपूर्ण भारतात फक्त नागपुरातच साजरा होतो. मारबत ही नागपूरकरांची ग्रामदेवता आहे की, ती 'या' गावावर येणारी सगळी संकटं, आपल्या सोबत दूर घेऊन जाते आणि विसर्जित होते. देशविदेशात चर्चा आणि वेगळी ओळख मिळालेल्या या उत्सवाला जवळपास 144 वर्षांची परंपरा लाभलीय. विशेष म्हणजे गणेशोत्सवापेक्षा ही जुना उत्सव म्हणून मारबत उत्सवाकडे बघितलं जातं. 

काय आहे मारबत परंपरा?

मुळात मारबत ही प्रथा मध्य प्रदेशातील काही आदिवासी जमातीत दिवाळीच्या रात्री साजरी करतात. विशिष्ट आकारातली मातीची मूर्ती इडा-पीडा, अमंगलतेचे प्रतीक म्हणून गावाबाहेर ढकलत नेतात. पण मग ही प्रथा खूप वेगळ्या स्वरूपात नागपुरात कशी रुजली? याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. 

यामागचा इतिहास असा की, महाराणी बाकाबाई भोसले या नागपूरकर भोसल्यांच्या राणीने इंग्रजांशी तथाकथित हातमिळवणी केली. त्यामुळे नागपूरचे समाजमानस क्षुब्ध झाले होते. या घडल्या घटनेचा मोठ्या प्रमाणावर निषेध करण्यासाठी बाकाबाईला स्वार्थी, देशद्रोही ठरवून त्यांचे प्रतीक म्हणून 'काळ्या मारबती' चा जन्म झाला.

हेसुद्धा वाचा - महाराष्ट्रातील फक्त 'या' ठिकाणी साजरा होतो तान्हा पोळा, काय आहे त्यामागचे कारण?

मग तिचे पती- रघुजीराजे भोसले (दुसरे) यांनी त्यांना रोखले नाही म्हणून त्यांचं प्रतीक बडग्याच्या रूपाने अवतरलं. पुढे इंग्रजांना नामोहरम करण्यासाठी कर्तबगार बाकाबाई भोसल्यांची ती रणनीती होती हे सिद्ध झालं. पण सुरू झालेली प्रथा बंद पाडणं नागपूरकर आजही पाळतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZEE 24 TAAS (@zee24taas)

पिवळी मारबतीची परंपरा!

नागपूरच्या जगनाथ बुधवारी भागात राहणाऱ्या तेली समाज बांधवांनी 'पिवळी मारबत' उत्सव 1885 साली साजरा करण्यास सुरुवात केली. यावर्षी पिवळ्या मारबतीला 140 वर्ष पूर्ण झाले आहेत. लोकांच्या रक्षणासाठी पिवळी मारबतीची मिरवणूक काढली जाते. पिवळ्या मारबतीची मिरवणूक काढल्यानंतर तिचं दहन केलं जातं. विशेष म्हणजे, लहान मुलांना घेऊन महिला दर्शनासाठी येतात.