कार्यक्षम जिल्ह्याधिकाऱ्यांमुळे या जिल्ह्यात प्राणवायू कमी पडणार नाही...

प्राणवायू विकत न आणता तो हवेतूनच शोषून घेत रुग्णांना द्यायचा विचार नंदुरबार जिल्ह्याधिकारी डॉ राजेंद्र भारूड यांनी केला आणि तीन ऑक्सिजन (प्राणवायू) निर्मितीचे प्रकल्प त्यांनी उभारले.

Updated: Apr 26, 2021, 10:22 PM IST
कार्यक्षम जिल्ह्याधिकाऱ्यांमुळे या जिल्ह्यात प्राणवायू कमी पडणार नाही... title=

नंदूरबार : देशात सध्या चर्चा आहे ती नंदूरबार पॅटर्नची. कोरोनाच्या या महाप्रकोपातून रुग्णांना वाचवू शकेल तो प्राणवायूच ... हाच प्राणवायू विकत न आणता तो हवेतूनच शोषून घेत रुग्णांना द्यायचा विचार नंदुरबार जिल्ह्याधिकारी डॉ राजेंद्र भारूड यांनी केला आणि तीन ऑक्सिजन (प्राणवायू) निर्मितीचे प्रकल्प त्यांनी उभारले.

नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सप्टेंबर महिन्याच्या मध्यापासून सुरुवात झाली. दुसरी लाट येऊ शकते हे लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारूड यांनी तयारी सुरु केली. नंदुरबार जिल्हा रुग्णालयात त्यांनी ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आणि काही दिवसात हा प्रकल्प सुरु झाला.  त्या प्रकल्पाचा लाभ लक्षात घेत अजून दोन ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभारले गेले, जे आज कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहेत.

पहिली लाट ओसरल्यानंतर डॉ भारूड यांनी जिल्हा रुग्णालयात उभारलेल्या, या ऑक्सिजन निमिर्ती प्रकल्पातून 250 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर भरून ऑक्सिजन हवेतून मिळतो. यातून 101 कोरोना रुग्णांची ऑक्सिजनची गरज पूर्ण होत आहे. शहादा येथे तिसरा असा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे.

या प्रकल्पासाठी डॉ भारूड यांनी सी एस आर आणि जिल्हा नियोजनाचा निधी वापरला. जिल्हा रुग्णालयात डॉ भारूड यांनी उभारलेला ऑक्सिजन निमिर्ती प्रकल्प आता देशात दिशादर्शक ठरत आहे. देशातील जिल्हा रुग्णालयांमध्ये अश्या स्वरूपाचे प्रकल्प तयार करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. नंदुरबार आदिवासी जिल्हा असला तरी आज हा जिल्हा देशाला दिशादर्शक ठरला आहे. या नंदुरबार पॅटर्न मुळे देशात कोरोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेचा सामना करने सोपं होणार आहे.

जिल्हा रुग्णालय ऑक्सिजनच्या बाबती आत्मनिर्भर असल्याने रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक निश्चिंत जिल्ह्यात सध्यास्थिती सुमारे साडेसात मेट्रिक टन ऑक्सिजन लागतो, त्यातला मोठी गरज या तीन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पातून पूर्ण होते.