चंद्रकांत पाटील उद्या राज ठाकरे यांना भेटणार, पहिल्यांदा 'या' निवडणुकीत जवळ येण्याची चिन्हं?

 राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये गेल्या काही दिवसांपासून मनसे (Maharashtra Navnirman Sena) आणि भाजप (Bhartiya Janta Party) एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

Updated: Aug 5, 2021, 06:55 PM IST
चंद्रकांत पाटील उद्या राज ठाकरे यांना भेटणार, पहिल्यांदा 'या' निवडणुकीत जवळ येण्याची चिन्हं? title=

मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये गेल्या काही दिवसांपासून मनसे (Maharashtra Navnirman Sena) आणि भाजप (Bhartiya Janta Party) एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे उद्या 6 ऑगस्टला मनसेप्रमुख राज ठाकरे (Mns Chief Raj Thackeray) यांची भेट घेणार आहे.  चंद्रकांत पाटील हे राज ठाकरेंच्या मुंबईतील कृष्णकुंज (Krusnakunj) या निवासस्थानी सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी भेट घेणार आहेत. (maharashtra bjp state president chandrkant patil will meet to mns chief raj thackeray to 6 august 2021 in krusnkunj over to upcoming mumbai coroporation election 2021)

या विषयावर चर्चा होण्याची शक्यता....

मुंबईतील महापालिका निवडणुकींना आता काही महिन्यांचा अवधी बाकी आहे. त्याआधीच भाजपने मुंबई महापालिकेचा ताबा शिवसेनेच्या हातातून काढून घेण्यासाठी सुरुवात केली आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्ष एकत्र येण्यावर या बैठकीत चर्चा होऊ शकते. त्यामुळे आता राज्यातील सर्वांचेच या बैठकीकडे लक्ष लागून राहिलंय.