'विरोधातील आमदारही आमच्या संपर्कात, मुख्यमंत्री आमचाच'

 जागावाटप आणि मुख्यमंत्री कोणाचा ? यावरून राज्यात राजकारण रंगले आहे.

Updated: Oct 28, 2019, 07:33 PM IST
'विरोधातील आमदारही आमच्या संपर्कात, मुख्यमंत्री आमचाच' title=

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर आता जागावाटप आणि मुख्यमंत्री कोणाचा ? यावरून राज्यात राजकारण रंगले आहे. भाजपा आणि शिवसेनेत कोणीही बॅकफूटवर येण्यास तयार नाही. ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती आदित्य ठाकरेंच्या रुपाने आमदार असून आता त्यांना मुख्यमंत्री बनविण्याच्या हालचाली सुरु आहेत. हे सर्व पाहता मुख्यमंत्री पद आमच्याकडेच राहील हे भाजपाने स्पष्ट केले.

आम्हाला १५ अपक्षांचे समर्थन मिळाले असून छोटे पक्ष आणि काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचे भाजपातर्फे सांगण्यात होते. २०१४ पर्यंत संख्याबळाच्या आधारे मजबूत स्थिती असल्याचा संदेश शिवसेनेला देण्याचा प्रयत्न आहे.

आमच्यासोबत १५ अपक्ष आमदार असल्याचे भाजपा प्रवक्ता श्वेता शालिनी यांनी सांगितले. हे अपक्ष भाजपाचेच आहेत. ज्यांना युती आणि उमेदवारी न मिळाल्याने स्वतंत्र लढून जिंकले आहेत. २०१४ प्रमाणेच पार्टीकडे १२२ आमदार असल्याचे त्या म्हणाल्या.