'शिस्त पाळा अन्यथा...', एकनाथ शिंदेंचा नवनीत राणा आणि रवी राणा यांना जाहीर इशारा

Eknath Shinde on Navneet Rana Ravi Rana: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्यावर निशाणा साधला आहे. महायुतीमध्ये (Mahayuti) मिठाचा खडा टाकायचं काम करु नका असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.   

शिवराज यादव | Updated: Nov 12, 2024, 03:53 PM IST
'शिस्त पाळा अन्यथा...', एकनाथ शिंदेंचा नवनीत राणा आणि रवी राणा यांना जाहीर इशारा title=

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024, Eknath Shinde on Navneet Rana: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्यावर निशाणा साधला आहे. महायुतीमध्ये (Mahayuti) मिठाचा खडा टाकायचं काम करु नका असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. अमरावतीच्या दर्यापूरमधील प्रचारसभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे विधान केलं आहे. महायुतीमध्ये राहून महायुतीविरोधात काम करणा-यांची नोंद घेतली जाणार असल्याचा इशाराही एकनाथ शिंदेंनी राणा दाम्पत्यांना दिला आहे.

"महायुती मजबूतीने लढत आहे. महायुतीत कोणीही मिठाचा खडा टाकण्यातं काम करु नका. मी राणा परिवारालाही सांगतो की, तुम्ही महायुतीचे घटक आहात. महायुतीत सरकार तुमच्या पाठीशी उभं राहिलं आहे. सरकार आणण्यासाठी कॅप्टन अभिजीत अडसूळदेखील आपल्याला हवे आहेत. म्हणून आपण देखील महायुतीची शिस्त पाळली पाहिजे. महायुतीत राहायचं आणि महायुतीच्या विरोधात काम करायचं हे कोणी करता कामा नये. मुख्यमंत्री म्हणून मी हे आवाहन करत आहे," असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. 

एकनाथ शिंदे यांनी दर्यापूरमधील सभेतनंतर एक्सवर पोस्ट शेअर करत कॅप्टन अभिजित अडसूळ यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आवाहन केलं. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षाचे महायुतीतील अधिकृत उमेदवार कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्या प्रचारासाठी आज पार पडलेल्या प्रचारसभेस दर्यापूरकरांचा उदंड प्रतिसाद लाभला. कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्या रूपाने एक उच्चशिक्षित उमेदवार शिवसेनेने दिला आहे. त्यांचे वडील खासदार झाल्यापासून ते या मतदारसंघात काम करत आहेत. येत्या 23 तारखेला त्यांचे विमान विधानसभेत नक्की पोहचवा जेणेकरून दर्यापूरच्या विकासाचा टेक ऑफ घेऊ शकेल असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.