Nanded By Election: केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे. दरम्यान यासह 48 विधानसभा आणि 2 लोकसभा जागांवरील पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. 13 नोव्हेंबरला 47 विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक पार पडणार आहे. तर केदारनाथ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होईल.
याशिवाय 2 लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. यामधील एक मतदारसंघ वायनाड असून, दुसरा महाराष्ट्रातील नांदेड मतदारसंघ आहे. वायनाडमध्ये 13 नोव्हेंबरला मतदान होईल आणि नांदेडमध्ये 20 नोव्हेंबरला मतदान केलं जाईल.
'जर पेजरमध्ये स्फोट होऊ शकतो, तर मग EVM हॅक का होऊ शकत नाही?,' निवडणूक आयुक्तांनी स्पष्टच सांगितलं
नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे वसंतराव चव्हाण आमदार होते. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता. आजारामुळे त्यांचं निधन झालं होतं. त्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. तर वायनाडमध्ये राहुल गांधी यांनी निवडणूक जिंकली होती. पण वायनाडसह रायबरेलीतही ते विजयी झाले होते. यामुळे रायबरेली आणि वायनाड यापैकी एकच मतदारसंघ त्याना ठेवता येणार होता. वायनाड मतदारसंघ त्यांनी सोडल्याने येथे खासदारकीसाठी रिक्त जागा होती.
उमेदवार अर्ज भरण्याची शेवटची तारीख - 29 ऑक्टोबर
अर्जाची छाननी - 30 ऑक्टोबर
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख - 4 नोव्हेंबर
मतदानाची तारीख - 20 नोव्हेंबर
निकाल - 23 नोव्हेंबर
उमेदवार अर्ज भरण्याची शेवटची तारीख - 29 ऑक्टोबर
अर्जांची छाननी - 30 ऑक्टोबर
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख - 4 नोव्हेंबर
मतदानाची तारीख - 20 नोव्हेंबर
निकाल - 23 नोव्हेंबर
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत - 25 नोव्हेंबर
26 नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. महाराष्ट्रात एकूण 9.63 कोटी मतदार असून त्यात 4.46 कोटी महिला आणि 4.97 कोटी पुरुष आहेत. तरुणांची संख्या 1.85 कोटी असून, 20.93 लाख पहिल्यांदा मतदान करणारे मतदार आहेत. तसंच राज्यात एकूण 1 लाख 186 मतदान केंद्रं असतील अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
85 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना घरुन मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे. पैसे, मद्य, ड्रग्जता वापर यावक बारकाईने लक्ष असेल अशीही माहिती देण्यात आली आहे.