Maharashtra Assembly Election 2024 Astrologer Prediction: विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरुन वाटाघाटी सुरु आहेत. निवडणूक जाहीर होऊन आठवडा उलटल्यानंतरही केवळ भारतीय जनता पार्टीने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जहीर केली असून इतर पक्षांच्या उमेदवारांची नावं अजून गुलदस्त्यात आहेत. असं असतानाच निवडणूक जाहीर होण्याच्या आधापासूनच महाविकास आघाडी आणि महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण यावरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणि दावे-प्रतिदावे केले जात आहेत. या साऱ्या गोंधळादरम्यान एका भविष्यकाराने केवळ महाराष्ट्राच नाही तर महाराष्ट्राबरोबर निवडणूक जाहीर झालेल्या झारखंडमध्ये कोण बाजी मारेल याबद्दलच भाकित व्यक्त केलं असून महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण होईल हे सुद्धा सांगितलं आहे.
भविष्यकार अनिरुद्ध कुमार मिश्रा हे त्यांच्या अचूक भाकितांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी यापूर्वी व्यक्त केलेली अनेक भाकित खरी ठरली आहेत. यामध्ये कोरोनासारखी साथ येईल इथपासून ते अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाबद्दलची भाकितं खरी ठरली आहेत. त्याचप्रमाणे अनिरुद्ध कुमार मिश्रा यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांच्या भेटीचं भाकितही व्यक्त केलं होतं. इतकेच नाही तर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा तसेच करिना आणि सैफ अली खान पालक होतील हे अनिरुद्ध कुमार मिश्रा यांचं भाकित खरं ठरलं आहे.
अनिरुद्ध यांच्या बरोबर आलेल्या या भाकितांचा उल्लेख त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील पीन पोस्टवरुन दिसून येतो.
नक्की वाचा >> पुढचा CM कोण? महायुतीचा मोठा निर्णय! शाह शिंदे, फडणवीस, पवारांना म्हणाले, 'कोणत्याही...'
अनिरुद्ध यांनी 12 ऑक्टोबर रोजी केलेल्या पोस्टमध्ये, "ग्रह ताऱ्यांची स्थिती पाहता महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूक राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) जिंकेल," असं भाकित व्यक्त केलं आहे.
महाराष्ट्राबरोबरच झारखंडच्या निवडणुकीची घोषणाही केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. या राज्याचा निकालही 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. या राज्यातील निवडणूक कोण जिंकेल याबद्दल भाष्य करताना, "झारखंडच्या निवडणुकीमध्येही राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) जिंकेल," असा दावा अनिरुद्ध यांनी केला आहे.
नक्की वाचा >> काकांकडून पुतण्याचा 'टप्प्यात कार्यक्रम'? संपूर्ण देशाचं लक्ष बारामतीकडेच? अजित पवार विरुद्ध...
इतकच नाही तर अनिरुद्ध यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होतील याबद्दल रविवारी म्हणजेच 20 ऑक्टोबर 2024 रोजी एक पोस्ट केली आहे. "देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री असतील," असं देवेंद्र फडणवीस यांचा फोटो पोस्ट करत अनिरुद्ध यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, दिल्लीतील बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री म्हणून कोणाचाही चेहरा प्रमोट करु नये अशा अर्थाचा सल्ला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.