महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढला...केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली चिंताजनक माहिती

देशभरात नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्राचा (Maharashtra corona cases) तब्बल ६१ टक्के वाटा असल्याची माहिती आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. इतकंच नाही तर दररोजच्या कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूच्या प्रमाणातही ४६ टक्के प्रमाण हे महाराष्ट्रातच आहे. त्यामुळे संपूर्ण देशात महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती किती बिकट झाली आहे, हे लक्षात येत आहे.

Updated: Mar 17, 2021, 08:16 PM IST
महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढला...केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली चिंताजनक माहिती title=

मुंबई : देशभरात नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्राचा (Maharashtra corona cases) तब्बल ६१ टक्के वाटा असल्याची माहिती आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. इतकंच नाही तर दररोजच्या कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूच्या प्रमाणातही ४६ टक्के प्रमाण हे महाराष्ट्रातच आहे. त्यामुळे संपूर्ण देशात महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती किती बिकट झाली आहे, हे लक्षात येत आहे.

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट (corona second wave in Maharashtra) सुरू झाल्याचं याआधीच केंद्र सरकारने सांगितलेलं होतं. जर इतर राज्यांची संख्या पाहिली तर महाराष्ट्रासोबतच पंजाब, केरळमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या ३ राज्यांमधली रुग्णसंख्या पाहिली तर ती देशातील रुग्णसंख्येच्या ७६ टक्के आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात कुठे-कुठे वाढतोय कोरोना?

कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात नागपूर (Nagpur corona) आणि अमरावती विभागात जास्त आढळून येत आहेत. तर मुंबई आणि पुण्यातही रुग्णसंख्या जबरदस्त वेगाने वाढत आहे. चिंताजनक म्हणजे मुंबईपेक्षा नागपूरची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे, ज्यामुळे आता नागपूर जिल्हा कोरोनाचं हॉटस्पॉट(Nagpur corona hotspot) बनलं आहे.  

कोरोना रुग्णसंख्या वाढण्यामागे कारण काय?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दावा केला आहे की, मास्क घालण्यासाठी होत असलेली लोकांची टाळाटाळ आणि कोरोनाच्या नव्या स्ट्रेनकडे होणारं दुर्लक्ष ही रुग्णसंख्या वाढीची कारणं ठरू शकतात. आजही मार्केट, सार्वजनिक वाहतूक पाहिली, तर अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नसतो.

महाराष्ट्रात नियम कडक करण्यात आले आहेत, मात्र तरीही लोक ते पाळताना दिसत नाहीत.