देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरु, 12 उमेदवार रिंगणात

Nanded , Deglur-Biloli by-election : राज्यातील देगलूर विधानसभा पोटनिवडणूकीसाठी मतदान सुरु झाले आहे. 

Updated: Oct 30, 2021, 07:41 AM IST
देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरु, 12 उमेदवार रिंगणात title=

नांदेड :  Nanded , Deglur-Biloli by-election : राज्यातील देगलूर विधानसभा पोटनिवडणूकीसाठी मतदान सुरु झाले आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 7पर्यंत मतदानाची वेळ आहे. 346 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. (Maharashtra - 12 candidates in fray for Deglur assembly bypoll )

नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. 346 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रीया सुरु झाली आहे. 12 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाविकास आघाडीने एकच उमेदवार दिला आहे तर भाजपने आपल्या उमेदवाराच्या मागे मोठी ताकद लावली आहे. 

वंचित बहुजन आघाडीनेही आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला आहे. कोविड नियमावलीमुळे या मतदान प्रक्रियेसाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. सर्वच मतदान केंद्रावर थर्मल तपासणी करून मतदान प्रक्रिया राबवली जात आहे.

 नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा जागेसाठी आज होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी प्रमुख दावेदार काँग्रेस आणि भाजपसह तब्बल 12 उमेदवार रिंगणात आहेत. ही निवडणूक काँग्रेस आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे. काँग्रेसला आपली जागा जिंकायची आहे. तर पंढरपूरमधील पुनरावृत्ती करण्याची संधी भाजपने आखली आहे.

काही महिन्यांपूर्वी काँग्रेसचे विद्यमान आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीसाठी 23 उमेदवारांनी 34 अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर 12 उमेदवार रिंगणात उरले आहेत.  प्राप्त झालेल्या 23 उमेदवारी अर्जांपैकी दोन अवैध ठरले होते. दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल नऊ उमेदवारांनी शर्यतीतून बाहेर पडले.