दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा

दूध भुकटी निर्यात करणाऱ्या दूध संघांना  प्रति किलो 50 रुपये अनुदान देण्याचा निर्णय़ राज्य सरकारनं घेतला आहे. 

Updated: Jul 10, 2018, 09:21 PM IST

नागपूर : दूध भुकटी निर्यात करणाऱ्या दूध संघांना  प्रति किलो 50 रुपये अनुदान देण्याचा निर्णय़ राज्य सरकारनं घेतला आहे. तसेच  दूध निर्यात करणाऱ्या दूध संस्थांना   प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा  दुग्धविकास मंत्री महादेव जानकरांनी विधानसभेत केली. आगामी काळात राज्य सरकार शालेय पोषण आहारात दूध किंवा दूध भुकटी देणार असल्याचं जानकर यांनी सांगीतलं. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांवरील जीएसटीमध्ये  सवलत देण्याची केंद्र सरकारला शिफारस करण्यात आली आहे.राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांना  दिलासा मिळणार आहे.