कुत्र्यानं २० वेळा चावा घेतला, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

नाशिक शहरात एका मुलीला तिच्या राहत्या घरासमोर एका कुत्र्याने जवळपास २० वेळा चावा घेतल्याची घटना उघडकीस आलीय.

Updated: Jul 10, 2018, 06:51 PM IST

नाशिक : नाशिक शहरात एका मुलीला तिच्या राहत्या घरासमोर एका कुत्र्याने जवळपास २० वेळा चावा घेतल्याची घटना उघडकीस आलीय. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. रात्रीच्या वेळी आपल्या घरासमोर ही मुलगी उभी होती, त्यावेळी जवळच असलेल्या कुत्र्यांच्या टोळक्यातून एक कुत्रा आला आणि थेट त्या मुलीला चावा घेण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरलं आहे.

नाशिकमध्ये सातत्याने कुत्र्याने चावा घेण्याच्या घटना घडत आहेत. नवीन नाशिक, नाशिकरोड, आणि सातपूर या भागात असे प्रकार घडत आहे. मात्र नाशिक महानगरपलिकेकडून कुठलाही ठोस उपाय केला जात नसल्याचे समोर आले आहे. वर्षानुवर्षे निर्बिजिकरणाचे टेंडर दिले जात असून मात्र मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण येत नाही. प्रशासन फक्त कागदोपत्री यावर काम केल्याचा दावा करत असले तरी असे प्रकार वारंवार घडत आहे. मात्र याचा नाहक त्रास नागरिकांना होत आहे.