माढा लोकसभा निवडणुक निकाल 2024: घराणेशाहीच्या आरोपांमुळे चर्चेत आलेला माढा लोकसभा मतदारसंघ; निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील

माढा लोकसभा निवडणुक निकाल 2024: घराणेशाहीच्या आरोपांमुळे माढा लोकसभा मतदारसंघ चर्तेत आला. माढामध्ये मात्र, तिरंगी लढत पहायाला मिळत आहे.  भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर, शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे रमेश बारस्कर यांच्यात लढत झाली. मात्र, खरा सामना निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील असाच आहे.  धैर्यशील मोहिते-पाटील हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आहेत. 

वनिता कांबळे | Updated: Jun 4, 2024, 04:04 PM IST
माढा लोकसभा निवडणुक निकाल 2024: घराणेशाहीच्या आरोपांमुळे चर्चेत आलेला माढा लोकसभा मतदारसंघ; निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील  title=

Madha Lok Sabha Election Results 2024 Live :  घराणेशाहीच्या आरोपांमुळे माढा लोकसभा मतदारसंघ चर्तेत आला. माढामध्ये मात्र, तिरंगी लढत पहायाला मिळत आहे.  भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर, शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे रमेश बारस्कर यांच्यात लढत झाली. मात्र, खरा सामना निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील असाच आहे.  धैर्यशील मोहिते-पाटील हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आहेत. 

माढाचं राजकीय गणित

आतापर्यंत दोनवेळा राष्ट्रवादी काँग्रेसचा, तर एकदा भाजपचा खासदार माढ्यामधून विजयी झालाय.. 2009 साली शरद पवारांनी बारामतीऐवजी माढ्यामधून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. त्यांनी भाजपच्या सुभाष देशमुखांचा 3 लाख मतांनी पराभव केला. 2014 मध्ये मोदी लाटेतही माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर खासदार झाले. त्यांनी स्वाभिमानी पक्षाचे सदाभाऊ खोत यांना केवळ २५ हजारांच्या मताधिक्यानं हरवलं. त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटलांनी भाजपची वाट धरली. 2019 मध्ये भाजपनं उमेदवार बदलला... मोदी लाटेत रणजीतसिंह नाईक निंबाळकरांनी राष्ट्रवादीच्या संजयमामा शिंदेंचा ८५ हजार मतांनी पराभव केला. सध्या विधानसभेत राष्ट्रवादीचे 2, भाजपचे 2, शिवसेनेचा 1 आणि अपक्ष 1 असे सगळे महायुतीचे आमदार आहेत.

माढा... आधीचा पंढरपूर मतदारसंघ

माढा... आधीचा पंढरपूर मतदारसंघ... अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या पंढरीच्या विठुरायाची नगरी... संत सावता माळींचं जन्मगाव अरण देखील इथलंच... मनकर्णा नदीच्या तीरावर वसलेला हा भाग. माढेश्वरी देवीच्या   नावावरून माढा हे नाव पडलं... राव रंभाजी निंबाळकर राजेंनी बांधलेला प्राचीन भुईकोट किल्ला हे माढ्याचं वैशिष्ट्य... २००९ साली माढा हा नवा मतदारसंघ तयार झाला... सोलापूर जिल्ह्यातील चार आणि सातारा जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश माढामध्ये होतो. माढा तालुक्यातल्या अनेक गावात पाणीटंचाई पाचवीला पुजलीय. कुर्डुवाडीचा रेल्वे कारखाना कधीही बंद पडण्याच्या मार्गावर आहे.  कुर्डुवाडी मोठी बाजारपेठ असतानाही रेल्वे उड्डाणपूल नसल्यानं नागरिकांची गैरसोय होत आहे.  टेंभुर्णी अहिल्यानगर महामार्गाचं दुहेरीकरण रखडलंय. ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली. केममधील नैसर्गिक पद्धतीनं कुंकू बनवण्याचा उद्योग मदतीअभावी दुर्लक्षित ठरलाय. साखर कारखाने वगळता इतर कोणतेही औद्योगिक प्रकल्प वा वसाहती इथं नाहीत.